गेल्या काही वर्षापासून मानसिक तणाव किंवा प्रेमसंबंधांमुळे(marine drive) आत्महत्या करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. अशीच एक घटना मुंबईतील मरिन ड्रायव्हच्या समुद्रात घडली. सोमवारी मरिन ड्राइव्हच्या समुद्रात २३ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव ममता कदम असुन ही अंधेरी येथील रहिवाशी होती.
दरम्यान पोलीसांनी मुलीची बॅग आणि मोबाईलची तपासणी केल्यानंतर तिने वैयक्तिक(marine drive) कारणास्तल आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सोमवारी मरीन ड्राइव्हच्या समुद्रात एक तरुणी बुडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे मरीन ड्राइव्ह पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. या तरुणीला समुद्रातून बाहेर काढून मुंबईच्या जीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्या तरुणीला मृत घोषित करण्यात आले. यावेळी पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला असता.
या तरुणीने समुद्रात उडी मारण्यापूर्वी तिची बॅग चौपाटीवर सोडून गेली होती. तिच्या ओळखपत्राच्या आधारे पोलिसांनी ती महिला ममता प्रवीण कदम (23 वर्षे) असल्याचे समजले. ममता ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीत कामाला होती. सकाळी कामावर जाते अस सांगून घरातून बाहेर पडली. पण ती कामावर न जाता मरीन ड्रायव्हच्या समुद्रात उडी मारली. यावेळी, इंटरकॉन्टिनेन्टल हॉटेल समोरील चौपाटीवर ती समुद्रात उतरली होती, इथेच बुडून तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास तरुणीला पाण्यातून बाहेर काढले. तरुणीचा मोबाईल पोलिसांना सापडला असून, व्हॉट्सॲप चॅटिंगमुळे वैयक्तिक कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती मिळाली. या संदर्भात मरिन ड्राइव्ह पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
संभाजी राजे छत्रपतींना अटक करा! मुस्लिम समाजाची मागणी
एका रसगुल्लाने घातला लग्नात गोंधळ, रंग बिघडला, मारामारी आणि दगडांचा पाऊस
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांसोबत जाणार?; अजित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया