‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या लोकप्रिय मालिकेत नायराची भूमिका साकारलेली अभिनेत्री(video) शिवांगी जोशी सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. शिवांगीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये तिला एक प्रसिद्ध अभिनेता किस करताना दिसतोय. हे दोघं थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तिथे बॉक्सिंग मॅच बघताना शिवांगीला त्या अभिनेत्याने किसं केलं. त्यांचा हा व्हिडीओ मागून एका चाहत्याने शूट केला असून सोशल मीडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.
शिवांगीला किस(video) करणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तिचा सहकलाकार कुशल टंडन आहे. ‘बरसातें’ या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरच्या चर्चा आहेत. काही दिवसांपूर्वी शिवांगी आणि कुशल यांच्या साखरपुड्याच्याही चर्चा होत्या. मात्र दोघांनी अफेअर आणि साखरपुड्याच्या चर्चांना नाकारलं होतं.
कुशल आणि शिवांगी हे दोघं थायलंड फिरण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांनी बॉक्सिंग मॅचचा आनंद घेतला. बॉक्सिंग मॅच पाहतानाचा त्यांचा फोटो आधी व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांचा किसिंग व्हिडीओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या व्हिडीओमध्ये कुशल आणि शिवांगी हे दोघं मॅच बघत एकमेकांशी गप्पा मारताना दिसत आहेत. त्यादरम्यान कुशल सर्वांसमोर शिवांगीच्या गालावर किस करतो.
याआधी शिवांगी आणि कुशल या दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित रिलेशनशिपच्या चर्चांना फेटाळलं होतं. कुशलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं होतं, ‘मला एक गोष्ट सांगा की माझा साखरपुडा होतोय आणि त्याबद्दल मलाच माहीत नाही? मी इथे थायलंडमध्ये मार्शिअल आर्ट्स शिकतोय. तुम्ही माझ्यासोबत असं कसं करू शकता? किमान आधी बातमीचे तथ्य तरी तपासा. तुमचे सूत्र कोण आहेत?’
शिवांगी जोशी आणि कुशल टंडन यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘बरसातें’ ही मालिका गेल्या वर्षी जुलै महिन्यात सुरू झाली होती. त्यानंतर या वर्षी फेब्रुवारी महिन्यात या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला. शिवांगी आणि कुशलच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे. शिवांगी 25 वर्षांची तर कुशल 39 वर्षांचा आहे. मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. त्यांची ही केमिस्ट्री ऑफस्क्रीनसुद्धा झळकायची, म्हणून त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हेही वाचा :
एनडीए सरकारला आर्थिक सुधारणेसाठी करावी लागणार कसरत
काँग्रेसकडे 13 नव्हे 14 खासदार, पटोलेंना सांगलीचा ‘विशाल’ हात
वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची, उद्या माझी येईल, चंद्रहार पाटलांचा रोख नेमका कोणाकडं?