‘नवरा माझा नवसाचा-2’ या सिनेमातून अभिनेत्री हेमाली इंगळे ही प्रेक्षकांच्या भेटीला(find a boyfriend) येणार आहे. पण त्याआधी अभिनेत्रीच्या सोशल मिडियावरील पोस्टनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने नुकतच साखरपुडा उरकला असल्याची गोड बातमी चाहत्यांना दिली. त्यामुळे तिच्या चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे.
‘अशी ही आशिकी’ या सिनेमामुळे हेमाली प्रेक्षकांच्या पसंतीस(find a boyfriend) उतरली. या सिनेमात तिने अभिनय बेर्डेसोबत स्क्रिन शेअर केली होती. पण आता ती नवरा माझा नवसाचा-2 या सिनेमात स्वप्नील जोशीसोबत झळकणार आहे. पण सध्या हेमाली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
हेमालीने तिच्या सोशल मिडियावर एक्स बॉयफ्रेंड असं म्हणत तिच्या साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. त्यामुळे आता तिचा बॉयफ्रेंड तिचा होणार नवरा झाला असल्यामुळे तिने असं कॅप्शन दिलं आहे. जांभल्या रंगाचा ड्रेस हेमालीने यामध्ये परिधान केलाय.
हेमालीच्या फोटोवर अनेक कलाकारांनी देखील कमेंट करत तिच्या नव्या आयुष्यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वप्नील जोशीनेही कमेंट करत म्हटलं की, अखेर कुठेय तो? या प्रश्नाचं उत्तर मिळालं. श्रिया पिळगांवकर, रिंकु राजगुरु, रसिका वेंगुर्लेकर, चैत्राली गुप्ते यांसह अनेक कलाकारांनी हेमालीच्या नव्या इनिंगसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
सचिन पिळगांवकर निर्मित आणि दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा-2 हा सिनेमा येत्या 20 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अनेक दिग्गज कलाकारांसोबत हेमाली झळकणार आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या सिनेमात आहे. जवळपास 19 वर्षांनी नवरा माझा नवसाचा-2 हा सिनेमाचा सिक्वेल येणार असून प्रेक्षकांना या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे.
हेही वाचा :
रतन टाटांचा एक निर्णय… चीनला देखील फुटला घाम…
बांगलादेश हिंसाचार वाढवणार भारताची डोकेदुखी?; केंद्र सरकार अॅक्शन मोडवर
महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा! वर्षभरानंतर डाळींच्या दरात घरसण