तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते(actor) आणि दिग्दर्शक मनोज भारतीराजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते ४८ वर्षांचे होते. मंगळवारी संध्याकाळी चेन्नई येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मनोज भारतीराजा हे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक भारतीराजा यांचे पुत्र होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हृदयविकाराशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी संध्याकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूच्या नदीगर संगम या कलाकार संघटनेने त्यांच्या निधनाची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
मनोज भारतीराजा यांच्या निधनाने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दुःख व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त केल्या आहे. स्टॅलिन यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले की, “मनोज यांनी त्यांच्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ‘ताजमहल’ चित्रपटातून अभिनय(actor) क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.” चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी देखील त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

मनोज भारतीराजा यांनी १९९९ मध्ये त्यांच्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या ताजमहल या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर समुथिराम, अल्ली अर्जुन, वरुशमेलम वसंतम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
२०२३ मध्ये त्यांनी मार्गझी थिंगल या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. त्यांच्या शेवटच्या कलाकृतींपैकी एक स्नेक्स अँड लॅडर्स हा वेबसीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. मनोज भारतीराजा यांच्या निधनामुळे तामिळ चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी अभिनेता आणि प्रतिभावान दिग्दर्शक गमावला आहे. त्यांच्या जाण्याने भारतीराजा कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
अवकाळीने झोडपले! सांगलीत वीज पडून महिलेचा मृत्यू…
क्षणांत होत्याचं नव्हतं झालं! ओव्हरटेक करायला गेला अन्…; भयानक घटनेचा VIDEO व्हायरल
रेल्वे स्टेशनवर खुनी खेळ, बाप-लेकीला धाडधाड गोळ्या झाडल्या, मग स्वत:लाही संपवलं