विधानसभेच्या तोंडावर ‘स्वराज्या’ची नांदी; छत्रपती संभाजीराजे यांनी दिली आनंदवार्ता…!

मुंबई : छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेची निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष(political issue) अशी नोंदणी भारतीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. तसेच निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. याबाबत छत्रपती संभाजीराजेंकडुन फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.

आनंदवार्ता…!
स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, दि. ०९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली “स्वराज्य संघटना” आता भारतीय निवडणूक आयोगाकडे “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून “महाराष्ट्र स्वराज्य पक्ष” म्हणून ओळखला जाईल.

याचबरोबर, आगामी विधानसभा(political issue) निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित !

हेही वाचा:

दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले

अभिनेता गोविंदाला लागली स्वतःच्याच रिव्हॉल्वरमधून सुटलेली गोळी

उद्धव ठाकरेंना आमदार होण्यासाठी निवडणूक लढवण्याचे आव्हान: एकनाथ बावनकुळे