देशातील कोट्यवधी पीएफ खाते(PF account) धारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ खातेदारांना अधिक व्याज देण्यासाठी ईपीएफओकडून महत्वाचे पाऊल उचलले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनातून ठराविक रक्कम ईपीएफओकडे जमा केली जाते.या रकमेवर प्रत्येक वर्षी व्याज दिले जाते. त्यासंदर्भात लवकरच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
2015 पासून ईपीएफओला इक्विटी गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळत आहे.यामुळे पीएफ खातेदारांना(PF account) व्याजदर वाढवून देण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. 2024 मध्ये म्हणजेच या चालू वर्षात पीएफ खातेदारांना 8.25 टक्के दराने व्याज देण्यात आले. तर, ईपीएफओच्या इक्विटी मधील गुंतवणुकीवर साधारणपणे 9.5 टक्के परतावा मिळत आहे.
अशात केंद्रीय श्रम मंत्रालयाने नुकतीच एक अंतर्गत समिती स्थापन केली असून त्यांना इक्विटी गुंतवणुकीतून अधिक परतावा कसा मिळवावा यासाठी पर्याय शोधण्याचं काम देण्यात आलं आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 2024 मध्ये खातेदारांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे.
ईपीएफओने 15.29 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक 2024 मध्ये इटीएफमध्ये केली आहे. पीएफ खातेदारांना व्याज त्यांच्या दरमहा दिल्या जाणाऱ्या योगदानावर दिलं जातं. मात्र, ते संबंधित आर्थिक वर्षाच्या अखेरिस पीएफ खातेदारांच्या खात्यात वर्ग केलं जातं.
2015 साली श्रम मंत्रालयाने 5 ते 15 टक्क्यांपर्यंत इक्विटीमधील गुंतवणूक वाढवण्यास मान्यता दिली होती. त्यावर्षी ईपीएफओने 5 टक्के गुंतवणूक इटीएफमध्ये केली होती. सध्या ती 10 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून 15 टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते. आम्हाला गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळाल्यास आम्ही पीएफ खातेदारांना अधिक व्याज देऊ, असं एका मोठ्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.
पीएफ खातेदारांना 2022-23 मध्ये 8.15 टक्के व्याज मिळाले. तर, 2021-2022 या आर्थिक वर्षात 8.10 टक्के व्याज पीएफ खातेदारांना देण्यात आले. अशात पीएफ खातेदारांना व्याजदर वाढवून देण्याबाबत ईपीएफओकडून विचार केला जाऊ शकतो. यामुळे कोट्यवधी पीएफ खातेदारांना नवीन वर्षात मोठा फायदा होऊ शकतो.
हेही वाचा :
अल्लू अर्जुनच्या चाहत्यांना धक्का, ‘पुष्पा’ पुन्हा जाणार तुरुंगात?
‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, काही दिवसांतच होणार मालामाल…
खुशखबर! लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार, डिसेंबर-जानेवारीचे ३००० रुपये एकत्र मिळणार?