भाजप-अजित पवार गटाला भगदाड; तीन बडे नेते ठाकरेंच्या गळाला

मुंबई: राज्यात विधानसभा(politics) निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. एकीकडे शरद पवार सत्ताधाऱ्यांना धक्क्यांवर धक्के देत आहेत. तर दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतही जोरदार इनकमिंग सुरू झाल्याचे दिसत आहे. अशातच भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना धक्का देत दोन बडे नेते आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा महायुतीला ‘जोर का झटका’च असणार आहे.

अजित पवार आणि भाजपला(politics) धक्का देत कोकणातील भाजप नेते राजन तेली, सांगोला येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे दीपक आबा साळुंखे आणि चिंचवडचे मोरेश्वर भोंडवे आज मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश कऱणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोकणातील भाजपचे नेते राजन तेली हो सावंतवाडी मतदारसंघातील बडे नेते आहेत. ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ते शिंदे गटाचे दिपक केसरकर यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आज (18 ऑक्टोबर) संध्याकाळी 5 वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल.

त्यानंतर सांगोला मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. पम ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्याठिकाणी दिपक आबा सांळुखे हे शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात मैदानात उतरतील. त्याचबरोबर अजित पवार गटाचे चिंचवडचे मोरेश्वर भोंडवे आणि दिपक आबा साळुंखे यांचा सायंकाळी 6 वाजता पक्षप्रवेश होईल, अशी माहिती आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची आज जागावाटपाच्या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होईल. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोल आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तिघेजण पत्रकार परिषद घेतली.

हेही वाचा:

गिटार वाजवत गाणं गात भाजी विकणाऱ्या तरुणाची धूम; स्विगी इंस्टामार्टनेही केलं कौतुक

लाडक्या बहिणींना खरंच अडीच हजारांचा दिवाळी बोनस? जाणून घ्या नेमका शासन निर्णय

दप्तराचे ओझे शरीराच्या वजनाच्या १५% पेक्षा जास्त नको; शिक्षण विभागाचा आरोग्यपूरक सल्ला