“मृतदेह गंगा नदीच्या पाण्यात टाकले त्यामुळे..”, जया बच्चन यांचं वादग्रस्त वक्तव्य

उत्तर प्रदेशात महाकुंभ(Mahakumbh) पर्व मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरण सुरू आहे. काही दिवसांपूर्वी याच महाकुंभात चेंगराचेंगरीची घटना झाली होती. या घटनेत तीस भाविकांचा मृत्यू झाला होता. विरोधी पक्षांनी या मुद्द्यावर सरकार टीकेची झोड उठवली आहे.

यात आता समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांची भर पडली आहे. जया बच्चन यांनी एक अतिशय वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी महाकु्ंभातील(Mahakumbh) पाणी सर्वात प्रदूषित असल्याचे म्हटले.

जया बच्चन म्हणाल्या, या सभागृहात या वेळेस जलशक्ती विभाग घाण पाण्यावर चर्चा करत आहे. यावेळी सर्वात प्रदुषित पाणी कुठे आहे. तर ते पाणी कुंभात आहे. मृतदेह (चेंगराचेंगरीत मरण पावलेले) नदीत टाकले गेले आहेत ज्यामुळे पाणी प्रदुषित झाले आहे. वास्तवातील मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. गंगा नदीत मृतदेह फेकून देण्यात आले तेच पाणी लोकांपर्यंत येत आहे.

परंतु, जे गरीब लोक आहेत सर्वसामान्य लोक आहेत त्यांना येथे कोणतेच सहकार्य मिळत नाही. त्यांच्यासाठी काही व्यवस्थाही येथे नाही. कंटेमिनेटेड पाणी सर्वात दूषित असते. आता तरी खरं सांगा की कुंभात नेमकं काय घडलं? महाकुंभात जी घटना घडली त्याची खरी माहिती सरकारने दिली पाहिजे.

चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. चौकशी सुरुच राहिल असे जया बच्चन म्हणाल्या. दरम्यान, खासदार बच्चन यांच्या या वक्तव्यावरून वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी पक्षातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला, जाणून घ्या कधी आणि कुठे?

आज मोठे शुभ योग; 3 राशी ठरणार लकी, पदोपदी मिळणार पैसाच पैसा

India vs Pakistan चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याची तिकिटे संपली, दीड लाखांहून अधिक चाहते पाहणार सामना