सांगलीमध्ये कबड्डीपटूची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात (exercise)आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या कबड्डीपटूवर ४ ते ५ जणांनी धारदार शस्त्राने वार करत हत्या केली. मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली. दहीहंडीच्या दिवशीच सांगलीमध्ये हा रक्तरंजित थरार घडला. त्यामुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी सांगली पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली शहरामध्ये एका कबड्डीपटू तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. अनिकेत हिप्परकर २२ वर्षे असे या कबड्डीपटूचे नाव आहे. सांगली शहरातील जामवाडी येथील मरगुबाई मंदिराजवळ पूर्वी झालेल्या वादाच्या रागातून या तरूणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून निघृणपणे हत्या करण्यात आली. हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाच जणांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक (exercise)अण्णासाहेब जाधव यांनी दिली.
अनिकेत एका आर्थिक संस्थेत पिग्मी एजंट म्हणून काम करत होता. जामवाडीतील एका सार्वजनिक मंडळातही तो सक्रीय होता. तसेच तो कबड्डीपटू देखील होता. काही महिन्यांपूर्वी झालेल्या हनुमान जयंतीवेळी त्याचा मंडळातील काही मुलांशी वाद झाला होता. त्यातून त्याने एकाला कानाखाली मारली होती. त्याचा राग आरोपी मुलांच्या मनामध्ये होता. अनिकेत नेहमीप्रमाणे व्यायामासाठी घराबाहेर पडला. जामवाडीतील मरगुबाई मंदिराजवळ तो थांबला होता. त्यावेळी आरोपींनी त्याला पूर्वी झालेल्या वादाचा जाब विचारला. त्यावरून त्यांच्यात पुन्हा वाद झाला.
आरोपी आपल्यासोबत कोयता घेऊन आले होते. यावेळी ५ जणांपैकी दोघांनी अनिकेतवर कोयत्याने सपासप वार करत त्याची हत्या केली. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला होता. अनिकेतच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (exercise)घटनास्थळी धाव घेत अनिकेतचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी सांगली पोलिसांनी पाचही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीचा श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा प्रयत्न केला. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे पोरिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा:
ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर आरोप: ‘मोदींच्या हस्तलाघवाने वास्तूंची दुर्दशा’
महाराष्ट्रात पावसाचा कहर: पुणे, रायगड ऑरेंज अलर्टवर; 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा
गौतमी पाटील बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार? चर्चेच्या पार्श्वभूमीवर तिची प्रतिक्रिया