सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं! लसणाची फोडणी महागली…

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी (budget)समोर आली आहे. मे महिना संपत आला तरीही अजूनही पालेभाज्यांचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. उन्हाळ्यामुळे पालेभाज्या खूप खराब होत आहेत. त्यामुळे पालेभाज्यांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत.

उन्हाळ्यात खूप जास्त गरम होते. याचाच परिणाम भाज्यांवरदेखील(budget) झाला आहे. हिरव्या पालेभाज्यांना थोडासा पिवळा रंग येत आहे. त्यामुळे पालेभाज्या लगेचच खराब होत आहे. त्यामुळे पालेभाज्यांचे उत्पादन कमी झाले आहे. परिणामी भाज्यांची किंमत वाढत आहे.

रिपोर्टनुसार, नवी मुंबईतील बाजारात रोज ४ ते ५ लाख पालेभाज्यांची गरज असते. परंतु आता बाजारात फक्त २ लाख ६७ हजार पालेभाज्यांची आवक होत आहे. यात कोथिंबीर, शेपू, पालक ,मेथी या पालेभाज्यांचा समावेश आहे. आवक घटल्याने भाज्यांच्या किंमती वाढल्या आहेत. किरकोळ बाजारात शेपू ५० रुपये जुडी विकली जात आहे. तर होलसेल मार्केटमध्ये ३० ते ४० रुपयांना विकली जात आहे. सर्व भाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.

पालेभाज्यांसोबतच लसणाचे दर काही उतरण्याचे चिन्हे दिसत नाहीत. लसूण घाऊक बाजारात १५० ते १६० रुपयांना विकले जात आहे. तर किरकोळ बाजारात तब्बल २०० रुपयांनी विकले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगला फटका बसत आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे भाज्या जास्त प्रमाणात खराब होतात. यामुळे उत्पादन कमी होते. त्यामुळे या किंमती वाढल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. याचाच फटका पालीभाजा उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे अनेक बाजारपेठेत भाजीपाल्याचे भाव वाढले आहे. फोडभाज्यांचे दर प्रति किलो ८० रुपये झाले आहेत. सध्या बाजारात कांदा-बटाटा वगळता सर्वच भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. अवकाळी पावसामुळे फळ, भाजीपाला, आंबा, लिंबू यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली आहे.पालक, कोथिंबीर जवळपास ८० रुपये दराने विकली जात आहे.

हेही वाचा :

 ग्रेट फिनिशरची आयपीएल कारकीर्द फिनिश?

राहुल गांधी यांनी हात जोडले, म्हणाले… अरे देवा

आता जिंकू किंवा मरू! राजस्थान-हैदराबाद आज क्वॉलिफायर-2 मध्ये भिडणार