कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर(couples therapy) लोकसभा मतदारसंघात “मान गादीला आणि मत मोदीना”असा प्रचार केला गेला. महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ आणि कुळ प्रचारात आणलं गेलं. तथापि सर्वसामान्य मतदारांनी या निवडणुकीत छत्रपती घराण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले आणि नवीन राजवाड्यावर विजयाचा गुलाल उधळला.
पहिल्या काही फेऱ्यांमध्ये छत्रपती शाहू महाराज(couples therapy) हे मताधिक्य घेत असल्याचे स्पष्ट झाल्यावर मीडियासमोर येऊन बोलताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी अजून बऱ्याच फेऱ्या आहेत. कागल तालुका लागला की माझं मताधिक्य पहा असे सांगितले होते. ज्या कागल विधानसभा मतदारसंघावर संजय मंडलिक यांची मदत होती त्यात कागल विधानसभा मतदारसंघात त्यांनी फक्त 13 ते 14 हजार मतांची आघाडी घेतली.
कागल मध्ये आपणाला एकतर्फी मतदान होईल असा त्यांचा अंदाज होता पण तो फोल ठरला. संजय मंडलिक यांच्या समर्थनासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, समरजीत सिंह घाटगे हा गट होता. हे दोन्ही गट कागल विधानसभा मतदारसंघातील. पण त्यांची जादू चालली नाही. किंबहुना मंडलिक यांच्यासाठी या दोन्ही गटांनी नेटाने प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. या दोन्ही गटांनी मनापासून प्रयत्न केले असते तर कागल मधील मताधिक्य किमान 50 हजार च्या पुढे गेले असते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर संजय मंडलिक यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक होते. आणि सतेज पाटील यांना कोणत्याही स्थितीत महाडिक यांना पराभूत करावयाचे होते म्हणून त्यांनी राजधर्म बाजूला ठेवून “आमचं ठरलंय” अशी टॅग लाईन घेऊन संजय मंडलिक यांना समर्थन देताना सर्व प्रकारची रसद पुरवली होती.
या निवडणुकीत मात्र संजय मंडलिक यांना पराभूत करण्यासाठी सतेज पाटील यांनी आपले संघटन कौशल्य पणाला लावून, छत्रपती शाहू महाराज यांना विजयाच्या मांडवाखाली आणले. खऱ्या अर्थाने ते या निवडणुकीत किंगमेकर ठरले. करवीर मतदारसंघातून शाहू महाराज यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले. याचा अर्थ तेथे आमदार पी एन पाटील यांनी जीवाचे रान केले होते. दुर्दैवाने छत्रपती शाहू महाराजांच्या वर विजयाचा गुलाल उधळला जात असल्याच्या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार त्यांना होता आले नाही. गड आला पण माझा सिंह गेला ही छत्रपती शाहू महाराजांची प्रतिक्रिया त्यासाठी पुरेशी बोलकी आहे.
छत्रपती शाहू महाराज यांना जनतेतून लोकसभेवर निवडून जाण्याची राजकीय महत्वकांक्षा तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपासून होती. राजीव गांधी हे पंतप्रधान असताना त्यांचा एक कार्यक्रम कोल्हापुरात झाला होता. तेव्हा व्यासपीठावर असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्यांदा डोक्यावर काँग्रेसची म्हणून प्रसिद्ध असलेली पांढरी सफेद टोपी घातली होती. त्यानंतर 2024 मध्ये त्यांना थेट महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली. आणि पहिल्यांदाच लढवलेल्या निवडणुकीत त्यांना नेत्रदीपक यश मिळाले.
या निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या बद्दल संपूर्ण लोकसभा मतदारसंघात एक प्रकारचे नकारात्मक वातावरण होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला याबद्दलचा सल मतदारांच्या मनात होता. खासदारकीच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत संजय मंडलिक यांच्याकडून स्मरणात राहील असे एकही विकास काम झालेले दिसले नाही.
संजय मंडलिक यांना पुन्हा खासदार करण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी प्रचार काळात कोल्हापुरात सलग काही दिवस मुक्काम ठोकला होता. काही राजकीय जोडण्या केल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर प्रचार सभा घेतल्या होत्या. भारतीय जनता पक्षासारखा बलाढ्य पक्ष त्यांच्यासोबत होता. पण तरीही त्यांची”मात्रा”कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर चालली नाही.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी ही निवडणूक सामान्य मतदारांनीच सोपी करून ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, ज्यांनी हा जिल्हा जलसमृद्ध केला त्या राजर्षी शाहू महाराजांचे वंशज या दोन्ही महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची एक चांगली संधी आली आहे असे समजून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर विजयाचा गुलाल उधळला.
मुस्लिम मतदार हा काँग्रेसचा पारंपारिक मतदार म्हणून ओळखला जातो. इथल्या मुस्लिम समाजाला छत्रपती घराण्या बद्दल प्रचंड आदर आहे. तो त्यांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केला. दलित समाज, ख्रिश्चन समाज, बारा बलुतेदार, आठरा आलुतेदार, छत्रपती शाहू महाराज यांच्या बरोबर होता. सर्वात महत्वाचे म्हणजे जरांगे फॅक्टर हा ठामपणे छत्रपती शाहू महाराजांच्या मागे होता. याशिवाय पाटील, देशमुख, जहागीरदार, इनामदार, सरदार यांनीही शाहू महाराज यांना साथ दिली. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या बाजूने मिळालेला हा कौल आहे असे म्हणता येईल.
या निवडणुकीत प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात संजय मंडलिक यांच्याकडून त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ आणि कूळ काढून प्रचाराचा तो एक मुद्दा बनवला होता. त्यासाठी धुळ्याचे राजवर्धन कदमबांडे यांना भारतीय जनता पक्षाने खास विमान पाठवून कोल्हापुरात आणले होते. पण लोकांना हा प्रकार आवडला नव्हता. तो त्यांनी मतदान यंत्रातून व्यक्त केला.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा; हायअलर्ट जारी
टीम इंडियाने फोडला विजयाचा नारळ, आयर्लंडचा पराभव T20 ‘श्रीगणेशा’
लोकसभेच्या यशानंतर काँग्रेसचं वजन वाढलं! विधानसभेच्या १५० जागा लढवणार