क्रिकेट विश्वात शोककळा …भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान ‘या’ महान फलंदाजाचे निधन

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातबॉर्डर गावस्कर ट्रॉफी सामना रंगला आहे. आता याच(match) सामन्यादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली. ऑस्ट्रेलियाच्या एका महान फलंदाजाचे निधन झाले आहे. ज्या चाहत्यांना ही बातमी कळली ते देखील खूप दु:खी झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी सलामीवीर इयान रेडपाथ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने रविवारी याबद्दल माहिती दिली.

रेडपाथ हे 1960 आणि 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलियन संघाचा नियमित भाग होते. ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेमचे ते सदस्य देखील होते. जिलॉन्गचा रहिवासी असलेल्या रेडपथने 66 कसोटी(match) सामने खेळले आणि 43.45 च्या सरासरीने 4737 धावा केल्या, ज्यात 8 शतके आणि 31 अर्धशतक असा समावेश आहे. त्यांची सर्वोच्च धावसंख्या 171 होती. त्यांनी 83 विकेट्स घेतल्या. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर आता या बातमीमुळे ऑस्ट्रेलियात शोककळा पसरली आहे.

रेडपाथ यांनी 1963-64 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात MCG येथे कसोटी पदार्पण केले होते. सहकारी व्हिक्टोरियन बिल लॉरीसह त्यांनी 219 धावांच्या सलामीच्या भागीदारीत 97 धावांचे योगदान दिले. रेडपथ यांचे पहिले कसोटी शतक वेस्ट इंडिजविरुद्ध एससीजी येथे झाले. त्यांच्या संयम आणि सहनशीलतेमुळे ते लवकरच ऑस्ट्रेलियन फळीतील एक विश्वासार्ह फलंदाज बनले. 1974-75 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधार बनले. यानंतरही त्यांनी ही जबाबदारी इतर काही मालिकांमध्येही पार पाडली.

या दिग्गज फलंदाजाच्या निधनाने त्यांचे चाहतेही दु:खी झाले आहेत. अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. काही चाहत्यांनी त्याला महापुरुष म्हणत श्रद्धांजली वाहिली. तर एका चाहत्याने लिहिले, ‘एक महान क्रिकेटर! RIP’ असे लिहले.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, रेडपाथने व्हिक्टोरियासाठी 226 सामन्यांमध्ये 41.99 च्या सरासरीने 32 शतके आणि 84 अर्धशतकांसह 14,993 धावा केल्या. रेडपाथ प्रथम श्रेणी आणि सामुदायिक क्रिकेटमध्ये आणि व्हिक्टोरियन पुरुष प्रशिक्षक म्हणून आणि त्याच्या गावी विविध भूमिकांमध्ये सक्रिय राहिले. त्यांनी विशेषतः जिलॉन्ग क्रिकेट क्लबमध्ये काम केले.

हेही वाचा :

“महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर…”; जरांगे पाटलांची नवी मोठी घोषणा

आज जुळून आला अतिशय शुभ योग; 5 राशींचं नशीब लखलखणार

तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा; एकनाथ शिंदे म्हणाले…