मुंबईतील रिल स्टार (star) चार्टर्ड अकाउंटेंट असेलेली 27 वर्षीय तरुणी कु. आनवी कामदार ही माणगावमध्ये 300 फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. माणगावच्या कुंभे धबधबा येथे ही घटना घडली आहे. व्यवसायाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर असलेल्या तरूणीचा रिल बनवण्याच्या नादात जीव गेला आहे. झी 24 तास आवाहन करतंय, रिल्सच्या नादात जीवाशी खेळ करू नका.
रायगड जिल्ह्यातील माणगाव मधील कुंभे आणि देवकुंड हे धबधबे पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध (star) आहे. येथे पावसाळ्यात असंख्य पर्यटक येत असतातय. त्यात अति उत्साही तरुण तरुणी रील आणि फोटो काढण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता उत्साहाच्या भारत नको त्या धोकादायक ठिकाणी पोहोचतात.
रील बनवताना पाय घसरला…
कड्याच्या टोकावरील अरुंद आणि निसरड्या रस्त्यावरून जात असताना तिचा पाय घसरून ती 300 फूट खोल दरीत पडली. तिच्या सोबत असलेल्या मित्र मैत्रिणींनी ही माहिती जवळील माणगांव पोलीस स्थानकात दिली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जवळच्या सर्व बचाव पथकांना बोलावले. कुंभे ग्रामपंचायत सरपंच आणि काही सदस्य, ग्रामपंचायतचे कर्माचारी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. महावितरणचे कर्मचारी देखील बचाव कार्यासाठी पुढे सरसावत बचाव पथके येण्यापूर्वी खोल दरीचा घेत आढावा घेत होते. विळे येथील शेलार मामा रेस्क्यू टीम देखील तातडीने तेथे पोहोचली परंतु पाऊस आणि अतिशय धुके असल्यामुळे आणि अपुऱ्या उपकरणांमुळे काहीच करणे शक्य होत नव्हते.
सदरची घटना कळताच कोलाड रेस्क्यू टीम चे सागर दहींबेकर त्वरित आपल्या सहकाऱ्यांसोबत निघाले त्यांनी माणगांव येथील वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना सदरचा कुंभे परिसर अधिक परिचयाचा असल्यामुळे संपर्क साधला असता ते देखील तातडीने आपल्या सहकार्यांसोबत निघाले. जवळपास दुपारी एकच्या सुमारास येथे पोहोचताच बचावकार्य सुरु कारण्यात आले.
हेही वाचा :
बनावट औषध निर्मिती प्रकरण उघडकीस; 1 करोड 41 लाखांच्या वस्तूंसह मुद्देमाल जप्त
भारतीय अर्थव्यवस्थेचा जबरदस्त उड्डाण: जागतिक मंचावर मिळवले महत्त्वाचे स्थान
महाकाय अजगराने काही सेंकदात चक्क गिळले हरीण..