हत्ती (elephant)हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. पोटभर खाणं आणि झोपणं या पलिकडे तो फारसा विचार करत नाही. शिवाय तो शाकाहारी प्राणी असल्यामुळे इतर प्राण्यांवर नजर ठेवणं हे देखील त्याच्या स्वभावात नाही. पण याच शांत प्राण्याला जेव्हा राग येतो तेव्हा अख्खं जंगल थरथरतं. कारण समोर अगदी सिंह आला तरी देखील त्याला तो उचलून तो दूर फेकू शकतो इतकी प्रचंड ताकत हत्तीमध्ये आहे.
अशाच एका संतापलेल्या हत्तीशी(elephant) माहूतानं पंगा घेतला. पण शेवटी त्याची काय अवस्था झाली हे आता तुम्हीच पाहा. हत्तीनं त्याला अक्षरश: पायदळी तुडवलं. हा व्हिडीओ avidahiyaavi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती हत्तीला काठीनं मारत आहे. बहुता तो या हत्तीचा माहूत असावा. कारण तो अगदी बिनधास्तपणे हत्तीजवळ उभा राहून दादागीरी करतोय. पण हत्ती हा अत्यंत स्वाभिमानी प्राणी आहे.
जर तुम्ही त्याचा अपमान केलात तर तो सहन करत नाही. कधी तो अन्नत्याग करून आपली नाराजी व्यक्त करतो तर कधी थेट आपल्या ट्रेनवरच हल्ला करतो. अन् असाच काहीसा प्रकार या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. माहूतानं काठी मारताच हत्तीला अपमानास्पद वाटलं आणि त्यानं एका फटक्यात त्याला खाली लोळवलं.
बरं, हत्ती एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं या माहूताला अक्षरश: पायदळी तुडवलं. काही मिनिटांपूर्वी जो व्यक्तीला हत्तीला घाबरवत होता तोच आता जीवाची भिक मागू लागला. हा व्हिडीओ पाहून बहुतांश नेटकऱ्यांनी हत्तीचं कौतुक केलं आहे. कारण त्यानं या माहूताला जन्माची अद्दल घडवली. व्हिडीओमध्ये त्याची अवस्था पाहाता हत्तीच्या वजनामुळे त्याची हाडं तुटली असण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
प्रतीक्षा संपली, उरले अवघे काही तास, ‘सिंघम अगेन’चा ट्रेलर, रोहित शेट्टीने दाखवली झलक
राहुल गांधी स्पष्टच बोलले आरक्षण प्रश्नाचे उत्तर संसदेतच मिळू शकते
युवकाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार, त्यांना मी सोडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा