पोटावर वाढलेला चरबीचा घेर कायमचा होईल गायब! आहारात ‘या’ मसाल्याच्या पदार्थाचे सेवन

शरीरावर वाढलेली चरबी(Fat) कमी करण्यासाठी महिला पुरुष सतत काहींना काही उपाय करतात. कधी प्रोटीन शेक पिणे तर कधी आहारात बदल केला जातो. मात्र वजन कमी करण्यासाठी चुकीच्या स्टेप्स फॉलो केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आहारात केलेल्या बदलांचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो.

रोजच्या जेवणात पौष्टिक पदार्थांचे सेवन न केल्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होऊन जाते. शरीरातील ऊर्जा कमी झाल्यानंतर आजारांची लागण होण्याची शक्यता जाते. याशिवाय शरीराची पचनक्रिया देखील बिघडू लागते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करताना शरीराला पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.

भारतीय मसाल्यांमध्ये लवंगचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. लवंगचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले ई, विटामिन सी, फोलेट, रिबोफ्लेविन, विटामिन ए, थायामिन आणि विटामिन डी यांसारखे घटक शरीरासाठी आवश्यक आहेत.वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लवंगच्या पाण्याचे सेवन करावे.

यामुळे पोटावर वाढलेली चरबी(Fat) कमी होते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. आज आम्ही तुम्हाला लवंगचे पाणी कसे तयार करावे? यामुळे शरीराला नेमका काय फायदा होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

लवंगचे पाणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम, टोपात ३ ग्लास पाणी घेऊन पाणी उकळण्यासाठी ठेवावे. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यांतर भाजून घेतलेलं जिरं, लवंग, दालचिनी टाकून टाकून घ्या. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर मसाल्यांचा सुंदर सुंगंध येईल. त्यानंतर गॅस बंद करून घ्यावे. नंतर तयार करून घेतलेलं पाणी लवंगचे पाणी गाळून घ्या. नंतर एक कप पाण्यात थोडस मध टाकून मिक्स करा आणि सेवन करावा. हा उपाय नियमित केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होईल आणि आरोग्याला अनेक फायदे सुद्धा होतील.

जगभरात वाढलेल्या वजनाने अनेक लोक त्रस्त आहेत. वजन वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी लवंगचे पाणी प्यावे. या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी अतिशय आवश्यक ठरतात. याशिवाय लवंगचे पाणी बनवताना मधाचा वापर केला जातो. मधामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. लवंगच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील स्नायू सुधारतात.

हेही वाचा :

आज अनेक शुभ संयोग! ‘या’ 5 राशींसाठी धनलाभाचे संकेत…

अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अर्थसंकल्पात मोठी घोषणा!

पुन्हा एकदा पाहता येणार आर्ची -परश्याची ‘सैराट’ लव्ह स्टोरी; ‘या’ दिवशी होणार Re-release