सध्या अनेकजागी पावसाने हजेरी लावली असून काही जागी तर पूरग्रस्त स्थिती(death) निर्माण झाली आहे. या ऋतूत अनेक दुर्घटना घडत असतात ज्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच लोकांना सुरक्षेविषयक सतर्क राहण्याचा सल्ला दिला जातो. या काळात कुठे फिरताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते. मात्र अनेकदा पर्यटक या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि धोकादायक ठिकाणी मजामस्तीसाठी जाऊन आपला जीव धोक्यात घालतात. हा निष्काळजीपणा अनेकांच्या अंगलड येतो आणि विनाकारण लोकांना आपला जीव गमवावा लागतो.
पावसाळ्यात धोक्याची ठिकाणी अतिउत्साही पर्यटकांच्या जीवाचे(death) बरेवाईट झाल्याच्या अनेक घटना या ऋतूत येत असतात. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात समुद्रकिनारी उभा असलेला व्यक्ती थेट लाटेच्या प्रवाहात वाहून गेल्याचे दिसून येत आहे. त्याच्या मृत्यूचा हा जीवघेणा थरार आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांच्या तोंडच पाणी पळालं आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये जर नीट पाहिले तर दिसते की, एक अफाट समुद्र आहे. या समुद्रकिनारी लाटा उसळताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला एक तरुण दिसेल जो समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या खडकावर उभा आहे. इथपर्यंत सर्व ठीक सुरु असते मात्र तितक्यात अचानक एक मोठी लाट येते आणि खडकावर आदळते.
समुद्राच्या किनाऱ्यावर उभा असलेला हा तरुण या मोठ्या लाटेत वाहून जातो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये लिहिले आहे की, “आयुष्य म्हणजे खेळ नाही. दवाखान्यात बेडवर पडून जगण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या रुग्णाला विचारा आयुष्याची खरी किंमत”.
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @aprajeet_motivation नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, “खरी किंमत आयुष्याची..” असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “एवढे सुंदर जीवन आहे चांगले जगण्याचा प्रयत्न करा.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “शून्य टक्के आहे आयुष्याची किंमत” .
हेही वाचा :
महायुतीत काय चाललंय काय? अजित पवारांना BJP कार्यकर्त्यांनीच दाखवले काळे झेंडे
वाहन चालवताना चालकाला हृदयविकाराचा झटका, गाडीवरील नियंत्रण सुटलं अन्…
‘अजित पवारांबरोबर नाईलाजाने…; ‘या’ आमदारांच्या वक्तव्यांने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण