नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपालाच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर

नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांनी अखेर त्यांच्या आयुष्याच्या(wedding) एका नव्या जगात पाऊल ठेवले आहे. त्यांच्या नात्याबद्दल भरपूर चर्चाझाल्यानंतर अखेर त्यांनी एकमेकांसह लग्न करून या चर्चेला बंदी घातली आहे. दोघांनीही आता एकमेकांसोबत लग्न केले आहे आणि या दोघांचेही या कार्यक्रमातील अप्रतिम फोटोज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जे पाहून चाहत्यांना खूप आनंद देखील झाला आहे. आणि काही चाहत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.

नागा आणि सोभिताने आप्लया नव्या आयुष्याला(wedding) सुरूवात केली असून अखेर त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. समंथा प्रभूसह घटस्फोट घेतल्यानंतर नागा सोभिताला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र त्यावर शिक्कामोर्तब करत या दोघांनी साखरपुडा करत सर्वांनाच आनंदाचा धक्का दिलाय.

अभिनेत्याचे वडील नागार्जुन अक्किनेनी हे देखील अभिमानाने मुलगा नागा चैतन्य आणि नुकतीच झालेली सून सोभिता धुलिपाला आशीर्वाद देताना दिसत आहेत तसेच त्यांच्या सोबतदेखील या दोघांचे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत. पारंपारिक परंतु जिव्हाळ्याच्या समारंभात या दोघांनी त्यांच्या हा लग्नाचा कार्यक्रम पार पडला आहे. दोघेही एकमेकांसोबत या कार्यक्रमात खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहेत. नागाने पांढऱ्या रंगाचा पारंपारिक पोशाख परिधान केला होता, तर शोभिता गुलाबी रंगाच्या साडीत सुरेख दिसून येत आहे.

या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करताना, नागार्जुनने या दोघांचा आनंद पाहून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले की, त्यांनी सोभिताचे त्यांच्या कुटुंबात थाटात स्वागत केले आहे आणि लिहिले, “आम्हाला आमचा मुलगा, नागा चैतन्यचे सोभिताशी साखरपुडा होत असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे!! तसेच, तुम्हाला आमंत्रण करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आमच्या कुटुंबात या आनंदी जोडप्याचे अभिनंदन! त्यांना आयुष्यभर प्रेम आणि आनंदाच्या शुभेच्छा. देवाचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर असो, 8.8.8 अनंत प्रेमाची सुरुवात. असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

नागा चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांच्यात बऱ्याच दिवसांपासून डेटिंग असल्याच्या बातम्या येत होत्या. समंथा रुथ प्रभूया अभिनेत्री पाहून अभिनेत्याचा घटस्फोट झाल्यानंतर नागा आणि शोभिता हे दोघेही एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्यातील प्रेमाच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.

हेही वाचा :

कुस्तीपटू विनेश फोगाटला भारतरत्न आणि राज्यसभेची खासदारकी मिळणार?

‘नवनीत राणांना महायुतीबाहेर काढा नाहीतर…’, शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी