पुस्तकाच्या पानांची फडफड काही राजकारण्यांची चरफड

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : निवृत्त आयपीएस अधिकारी श्रीमती मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या “द पोलीस कमिशनर” या पुस्तकात लिहिलेल्या पुण्यातील एका प्रकरणाने अजितदादा पवार(politics) अडचणीत आले होते. आता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सर देसाई यांनी लिहिलेल्या पुस्तकांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत छगन भुजबळ यांच्यासह महायुतीची चांगलीच पंचाईत करून टाकली आहे. अर्थात भुजबळांनी त्याचा तातडीने इन्कार केला असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीला मात्र स्वतः झाऱ्यांना अडचणी जाणवण्यासाठी एक नवीन मुद्दा या निमित्ताने मिळाला आहे.

अजित दादा पवार यांनी राष्ट्रवादीत(politics) फूट पाडली. त्यानंतर आम्ही भाजपाशी हात मिळवणी करून सत्तेचा सहभागी झालो. त्याचा सर्वांनाच आनंद झाला. कारण ईडी पासून सर्वांचीच सुटका झाली होती. माझा तर राजकीय पुनर्जन्मच झाला. मूळ राष्ट्रवादीतून बाजूला होण्यापूर्वी शरद पवार यांना आम्ही ईडी विषयी सांगून भाजप सोबत जाण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले होते. असा खळबळजनक खुलासा छगन भुजबळ यांनी मी घेतलेल्या मुलाखती वेळी केला होता असा दावा पत्रकार राजदीप देसाई यांनी “द 2024/इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया”या त्यांच्या पुस्तकात केला आहे.

पुस्तक प्रकाशनानंतर त्यातील हे तपशील बाहेर आले. छगन भुजबळ यांनी मात्र हे सर्व खोटे आहे आणि निवडणुकीच्या वेळी ते मुद्दाम करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. पण माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेला मजकूर खरा आहे असे म्हटले आहे. भुजबळ आणि देशमुख हे आज दोघे वेगवेगळ्या आघाडीत असले तरी अडीच वर्षांपूर्वी ते महाविकास आघाडीत एकत्र होते.

राजदीप सरदेसाई हे ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि खोटे काहीतरी लिहून खळबळ माजवणाऱ्यापैकी ते नाहीत. ते स्पष्ट लिहितात, सत्य लिहितात. असा त्यांचा लौकिक आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेल्या मजकुरा विषयी शंका घ्यावी असे नाही. अंजली दमानिया यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्यात ते अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ तुरुंगात होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांना पुन्हा ईडीचे समन्स आले होते. आता आणखी या वयात तुरुंगात जाणे परवडणार नाही. असेही छगन भुजबळ यांनी राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलेले होते.

राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकातील काही राजकीय तपशील अर्थात छगन भुजबळ यांच्या विषयीचे बाहेर पडल्यानंतर खळबळ उडणे स्वाभाविक होते. मात्र एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुजबळ यांनी पुस्तकातील मजकूर नाकारला आहे. निवडणुकीनंतर आपण राजदीप सरदेसाई यांच्यावर माझ्या वकिलांचा सल्ला घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. फौजदारी खटल्यातून आपणाला क्लीन चिट मिळाली असे भुजबळ यांनी विधान केले आहे. त्यांना क्लीन चीट मिळालेली नाही. त्यांची सबळ पुराव्या अभावी भ्रष्टाचाराच्या खटल्यातून निर्दोष सुटका झालेली आहे. या खटल्यातून त्यांची सन्माननीय सुटका झालेली नाही. सबळ पुराव्या अभावी आणि सन्माननीय हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत.

सबळ पुरावा नाही, याचा अर्थ तुम्ही गुन्हा केलेला नाही असा होत नाही. आणि आता तर कनिष्ठ न्यायालयाने या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरुद्ध अंजली दमानिया यांनी वरिष्ठ न्यायालयात आव्हान दिले आहे. छगन भुजबळ यांनी अशा प्रकारची मुलाखत दिल्याचा इन्कार केलेला आहे. तर त्यांचेच एकेकाळचे सहकारी अनिल देशमुख यांनी मात्र पुस्तकातील सर्व मजकूर खरा असल्याचे म्हटले आहे. शरद पवार यांनी मात्र अद्यापही याबद्दलची आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुणे येथील येरवडा या मध्यवर्ती कारागृहा शेजारची काही एकर मोकळी जागा, एका विकसनकर्त्याला द्यावी असा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला होता. पण ही जागा मध्यवर्ती असल्याने पोलीस निवासस्थानासाठी तिचा वापर करता येईल असे मी त्यांना सांगितले होते. असे येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या तत्कालीन प्रमुख अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या”द पोलीस कमिशनर”या पुस्तकात लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर तसेच पुस्तकातील मजकूर मीडियात आला तेव्हा खळबळ उडाली होती. अजित दादा पवार यांनी तेव्हा त्याचा तात्काळ खुलासा करून इन्कार केला होता.

शरद पवार(politics) यांच्या”लोक माझे सांगाती”या त्यांच्या आत्मचरित्रातील दुसऱ्या भागाचे प्रकाशन झाल्यानंतर पुस्तकातील मजकुरामुळे खळबळ उडाली नव्हती मात्र प्रकाशन समारंभात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडत असल्याची घोषणा करून राज्यभर खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसात अजित दादा पवार यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध बंड केले आणि 40 आमदारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाशी हात मिळवणी केली. छगन भुजबळ यांच्या त्या तथाकथित मुलाखतीला तीच पार्श्वभूमी होती.

हेही वाचा :

राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजीत भव्य युवा मेळावा

इचलकरंजीतील महायुती प्रचार सभेत संजय पाटील यांचे हिंदुत्व व देशप्रेमाचा ओजस्वी उद्गार

मुश्रीफांसारख्या महाशक्तीच्या विरोधात उभारायचे धाडस फक्त ‘या’च व्यक्तीमध्ये