वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीला कर्मफळदाता म्हणून ओळखलं जातं. तर, शुक्र ग्रहाला सुख, वैभव, धन-संपत्ती आणि वैवाहिक जीवनाचा कारक ग्रह मानलं जातं. 29 मार्च रोजी शनी आणि शुक्राची युती जुळून येणार आहे. ही युती जवळपास 30 वर्षांनी मीन राशीत(zodiac signs) होणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. या शुभ राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.

वृषभ रास
वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि शनीची युती फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या(zodiac signs) अकराव्या चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुम्ही या कालावधीत सुरु करु शकता. प्रमोशनचे योग तुमच्यासाठी निर्माण होतील. या संधीचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुम्ही हाती घेतलेलं काम मनासारखं पूर्ण होईल.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ फार महत्त्वाचा असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती झालेली पाहायला मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कामांमध्ये चांगलं यश मिळेल. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला सपोर्ट मिळेल.
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. या राशीच्या चतुर्थ चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुम्ही एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. तसेच, धन-संपत्तीत चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. इतकंच नव्हे तर, शनीदेवाच्या कृपेने तुमच्या कार्यात कोणताच अडथळा येणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
भाजपच्या ‘या’ आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं
विमानतळावर महिलेचा नंगानाच पाहून प्रवाशी हादरले, पाहा व्हायरल व्हिडीओ!
‘ओ, कलेक्टर गाड्या कुठे आहेत?’; अजित पवारांचा पारा चढला अन् ‘हा’ आदेशच देऊन टाकला