लग्नासाठी नवरदेव सजला पण घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना वेगाने व्हायरल झाली आहे. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओज इथे पाहिले असतील मात्र सध्या इथे जी घटना व्हायरल होत आहे तो तुमचे होश उडवेल. लग्नसमारंभ(wedding) म्हटलं की सर्वत्र आनंदाचे वातावरण असते मात्र मध्य प्रदेशातील एका लग्नातील हेच आनंदाचे वातावरण अचानक दुःखात बदलले. ही हृदयस्पर्शी घटना आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये पाहून लोक आता आवाक् झाली आहेत.

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. येथे एका वराचा घोड्यावर मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सुरवातीला लग्नाचे सुंदर आनंदमय दृश्य दिसते ज्यात नवरदेव आपल्या लग्नमंडपात(wedding) जाण्यासाठी उत्सुक आहे. पण पुढच्याच क्षणी जे घडते ते सर्वांना धक्का देऊन जाते. पुढे घोड्यावर चढताच नवरदेवाला झटका येतो आणि काही क्षणातच तो खाली झुकतो. जेव्हा त्याला घोड्यावरून खाली उतरवले जाते तेव्हा त्याचा श्वास थांबला होता. यांनतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याला तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

श्योपूर जिल्ह्याचे एनएसयूआयचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंह जाट मिरवणुकीसह जाट वसतिगृहाच्या दारात पोहोचले. जिथे लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत केल्यानंतर वराने घोड्यावरून खाली उतरून दारात तोरण मारले आणि मग नाचायला सुरुवात केली. नाचल्यानंतर वर पुन्हा घोड्यावर बसले. हार घालण्यासाठी वराची घोड्यावर बसून स्टेजकडे वाटचाल सुरू होती. यादरम्यान, वराची तब्येत अचानक बिघडू लागली, लोकांना वाटले की तो नाचून थकला आहे, परंतु काही वेळातच वराचा श्वास थांबला. ही घटना व्हॅलेंटाईन डेची आहे.

ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यातील हृदयस्पर्शी दृश्य पाहून आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोणत्याही क्षणी कुणाचेही काहीही घडू शकते, आपण कोणत्याही गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही हे यावरून समजते. या घटनेचा व्हिडिओ @sachinguptaindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात एका लग्न समारंभात घोडीवर बसलेल्या वराचा अचानक मृत्यू झाला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मृत्यू कधी येईल याची शाश्वती नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हृदयविकाराचा झटका सर्वात प्राणघातक आहे”.

हेही वाचा :

सुरेश धस, तुम्ही सुद्धा एकाच माळेतले मणी निघालात….!

धक्कादायक! हुंड्यासाठी छळ, सुनबाईला दिलं एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट, रोहित आणि जडेजा घेणार निवृत्ती?