सोशल मेडिया एक अशी जागा आहे जिथे तुम्हाला जगभरातील अनेक गोष्टी एकाच जागी पाहायला मिळतील. इथे बऱ्याच गोष्टी व्हायरल होत आहे. या व्हायरल गोष्टी एकाच विषयाच्या नसून इथे अनेक वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होताना दिसून येतात. लोक यातील दृश्ये पाहून थक्क होतात आणि मग वेगाने त्यांना शेअर करू लागतात ज्यामुळे कमी वेळेतच ते अधिक लोकांपर्यंत पोहचतात आणि व्हायरल होतात. हे असे व्हायरल व्हिडिओज(Video) लोकांचे मनोरंजन करण्याचे काम करतात.

इथे बऱ्याचदा लग्नसमारंभातील देखील बरेच व्हिडिओ(Video) व्हायरल होत असतात. एखादा समारंभ म्हटला की त्यात अनेक गोष्टी एकत्र पार पडत असतात. अशात बऱ्याचदा आपल्या नकळत अशा काही घटना घडतात ज्यांचा आपण विचारही केला नसावा. या घटना कधी आपल्याला थक्क करतात तर कधी आपल्याला हास्याने लोटपोट करतात.
आतादेखील इथे अशीच एक हास्यास्पद घटना व्हायरल झाली आहे ज्यातील दृश्यांचा कधी कोणी विचारही केला नसावा. ही घटना सध्या वेगाने व्हायरल होत असून आम्हाला खात्री आहे की याला पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरता येणार नाही. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
वधू-वरांशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून कोणालाही हसू आवरणे कठीण होईल. या व्हिडिओमध्ये वधू आणि वर रिंग सेरेमनीनंतर डान्स फ्लोरवर रोमँटिक मूडमध्ये दिसत होते. दोघेही पाहुण्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यानंतर एक अशी घटना घडते जिला पाहून वधूलाही आपले हसू आवरता येत नाही.
तर घडते असे की, वर फिल्मी अंदाजात वधूला उचलण्याचा प्रयत्न करतो मात्र असे करताच अचानक मागून त्याची पँट फाटते आणि रोमँटिक वातावरणाचे हास्यात रूपांतर होते. सुरुवातीला वराला याची माहिती नसते, पण वधूची नजर त्याच्या पॅन्टवर पडताच तिला हसू आवरता येत नाही.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येते की वधूला वराची फाटलेली पँट समजताच ती जोरजोरात हसायला लागली. हे पाहून सर्व पाहुण्यांनाही हसू आवरता आले नाही. वधूचे हसणे आणि वराची लाजीरवाणी अवस्था व्हिडिओत स्पष्टपणे दिसून येते. यानंतर वराचे कुटुंब पटकन स्टेजवर येते आणि त्याला कव्हर करू लागते. यानंतर वर हे सर्व ठीक करण्यासाठी तेथून निघून जातो. ही घटना वरासाठी जरी लज्जास्पद असली तरी याचा व्हिडिओ मात्र अनेकांना हसवण्याचे काम करत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @seva_can111 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पँटला याचवेळी फाटायचे होते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे खूप हास्यापद आहे”.
हेही वाचा :
आता वाहनचालकांना लागणार शिस्त; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी LIC च्या नफ्यात जोरदार उसळी
दिल्लीचे तख्त भाजपाकडे “आप”ला मद्य घोटाळा भोवला