महायुतीमधील कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला येणार याची चर्चा अजून सुरूच असताना सांगलीमध्ये पालकमंत्री(minister) सुरेश खाडे यांनी मिरजमधून पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. सुरेश खाडे यांनी सोशल मीडियामध्ये मिरजत कमळचं अशी पोस्ट शेअर करत सलग पाचव्यांदा उमेदवारीसाठी दावेदारी दाखल केली आहे. त्यामुळे सुरेश खाडे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे का? अशी चर्चा आहे.
भाजपची पहिली यादी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरेश खाडे यांनी उमेदवारी एक प्रकारे जाहीर केली आहे का अशीही चर्चा आहे. सुरेश खाडे गेल्या काही वर्षांपासून मंत्री(minister) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विविध खात्यांचा कारभार पाहिला आहे. सध्याच्या महायुती सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते.
सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघातून चार वेळा बाजी मारली असून पाचव्यांदा आमदार होण्यासाठी त्यांच्यामसोर आव्हान असेल. दुसरीकडे, आमदार सुधीर गाडगीळ यांनाच सांगली विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
सांगली विधानसभेमध्ये सलग दोनवेळा सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला आहे. मात्र, हॅट्ट्रिकची संधी असताना त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केला होता. गाडगीळ यांच्यासमोर सक्षम पर्यायाची चाचपणी भाजपकडून सुरु आहे. ते शक्य न झाल्यास भाजपकडून पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तीन आमदार आहेत. काँग्रेसचे व भाजपचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. तर शिंदेसेनेचे एक आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचा एक असे जिल्ह्यातील पक्षीय बलाबल आहे. ठाकरे सेनेचा सांगली जिल्ह्यात एकही आमदार नाही.
हेही वाचा:
दारूच्या नशेत व्यक्तीचा अजब कारनामा; बैलासमोर गेला अन्…Video
वानखेडेंच्या राजकीय इनिंगला ब्रेक; शिवसेनेकडून निवडणूक लढवणार नाही
विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पूर्णपणे नेस्तनाबूत होतील, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल