भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सीरिजनंतर टीम इंडिया(cricketer) साऊथ आफ्रिका विरुद्ध 4 सामान्यांची टी 20 सीरिज खेळण्यासाठी साऊथ आफ्रिकेचा दौरा करणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया साऊथ आफ्रिके विरुद्ध पहिली टी 20 सीरिज खेळेल.
मात्र या सीरिजसाठी टीम इंडियाचे(cricketer) हेड कोच गौतम गंभीर हे साऊथ आफ्रिका दौऱ्यावर जाणार नसून त्या ऐवजी बीसीसीआयने टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी हेड कोच म्हणून भारताच्या माजी खेळाडूची निवड केली आहे. गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण हे साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर भारतीय संघाचे हेड कोच असतील असं सोमवारी बीसीसीआयच्या एका टॉप ऑफिशियलने क्रिकबझला याबाबत माहिती दिली.
साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया आणि सपोर्टींग स्टाफ 4 नोव्हेंबरच्या जवळपास रवाना होतील. मात्र यावेळी टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर हे भारतीय संघासोबत नसतील. तेव्हा बीसीसीआयने भारताचे माजी क्रिकेटर व्हीव्हीएस लक्ष्मण यांना टीम इंडियाच्या साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी हेड कोच म्हणून नेमलं आहे.
टीम इंडिया 8 नोव्हेंबर रोजी डरबन येथे साऊथ आफ्रिके विरुद्ध पहिला टी 20 सामना खेळेल. दुसरा सामना ते 10 नोव्हेंबर रोजी गकेबरहा येथे खेळतील. तर सेंचुरियन येथे 10 नोव्हेंबर रोजी तिसरा आणि जोहानिसबर्ग येथे चौथा सामना 15 नोव्हेंबर रोजी पार पडेल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सीरिजनंतर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील शेवटची टेस्ट सीरिज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये एकूण ५ टेस्ट सामने होतील.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने जिंकणं हे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचं असणार आहे. त्यामुळे गौतम गंभीर हा न्यूझीलंड सीरिजनंतर थेट भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलिया दौरा करेल.
साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंह, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, विजयकुमार वैशाक, आवेश खान, यश दयाल.
हेही वाचा :
भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का
‘सदा सरवणकर माघार घेणार?’ ऐकताच अमित ठाकरे हात जोडून म्हणाले
स्विस कंपन्या भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार; 10 लाख लोकांना मिळणार रोजगार!