कृरतेचा कळस, मोबाईलवर गेम खेळतो म्हणून बापाने केली मुलाची हत्या

बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी एका व्यक्तीने आपल्या 14 वर्षांच्या मुलाला क्रिकेटच्या बॅटने मारहाण करून आणि डोके भिंतीवर आपटून त्याची हत्त्या केली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. हत्त्येपूर्वी रवी कुमारने(father) आपल्या मुलावर अत्याचार तर केलाच पण खून लपवण्याचाही प्रयत्न केला.

कुमारस्वामी लेआउट परिसरात एका शाळकरी मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा अहवाल आल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पोलिस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य धक्कादायक होते. मृत मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, मुलाच्या डोक्यावर गंभीर अंतर्गत जखमा होत्या आणि त्याच्या शरीरावर देखील अनेक जखमा होत्या, ज्यावरून त्याचा मृत्यू होण्यापूर्वी त्याला क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती हे स्पष्ट होते. पोलिस तपासात असे समोर आले आहे की, रवी कुमार हा व्यवसायाने सुतार आहे. त्याचा मुलगा ९ व्या वर्गात शिकत होता. त्याला अभ्यासात अजिबात रस नव्हता.

घटनेच्या दिवशी मोबाईल दुरुस्त करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून कुमारला मुलाचा राग आला. त्याने क्रिकेटची बॅट घेत मुलगा तेजसला मारहाण केली. तेव्हड्यावरच त्याचा राग शांत झाला नाही तर, आपल्या मुलाचं डोकं भिंतीवर आपटलं आणि म्हणाला, “तू जगलास की मेला याची मला पर्वा नाही.”

यानंतर मुलगा जमिनीवर पडला आणि वेदनेने ओरडत राहिला. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांची प्रकृती ढासळत राहिली, परंतु तपासणीनुसार, श्वास थांबल्यानंतरच त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मृतदेहावरील रक्ताचे डाग साफ करून त्या व्यक्तीने खून लपवण्याचा प्रयत्न केला आणि अंत्यविधीची तयारी सुरू केली. त्याने बॅटही लपवली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा पुरावा नष्ट करण्याचा आणि केस सामान्य मृत्यूप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न होता. मुलाच्या कुटुंबात त्याचे आई-वडील आणि दोन लहान भाऊ आणि बहिणी आहेत. याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा :

आज प्रचार संपणार आणि उमेदवारांचं टेन्शन वाढणार!

‘हिच ती 3 सेकंदांची Clip ज्यासाठी धानुषने मागितले 10 कोटी’

शरद पवार यांचा मोठ्या नेत्याला इशारा; म्हणाले, माझ्यासोबत या, नाहीतर…