विशाळगडावर (fort)घडलेली घटना खरोखरच दुर्दैवी आहे. शरदचंद्र पवार यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. हे आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाशी आणि संस्कृतीशी जोडलेले आहे, त्यामुळे अशा घटना टाळण्याचे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून या घटनेच्या निषेधासाठी कडक पाऊले उचलावीत विशाळगडावर घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. शिवप्रेमींच्या नावाखाली काही गुंडांनी तेथे हैदोस घातला आहे. या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. सरकारने पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमणे काढायला हवी होती. येथे हिंसाचार करणाऱ्यांच्या पाठीशी जो कोणी असेल त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल व्हायला हवेत, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना केली.
विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकही मत फुटले नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले. आमदार जयंत पाटील म्हणाले की, विशाळगडावरील घटना ही दोन समाजात तेढ निर्माण करणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही कधी अल्पसंख्यांक समाजाला अशी वागणूक दिली नव्हती. तेथील काही लोकांनी अतिक्रमण काढायला न्यायालयातून स्टे मिळवला आहे.
हेही वाचा :
दारूच्या नशेत माजी नगरसेवकाच्या पुत्राने हॅरियर कारने टेम्पोला उडवलं, दोघे जखमी
चंदिपुरा विषाणूचा उद्रेक: गुजरातमध्ये ८ बालकांचा मृत्यू, चिंताजनक परिस्थिती
महाराष्ट्रात तरुणांसाठी ‘लाडका भाऊ’ योजनेत नवीन परिवर्तनांची घोषणा!