गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक(youth programs)कारवाईची गरज आहे. युवकामध्ये खुनाविषय भिती राहिली नाही. राजरोसपणे खंडणी उकळली जात आहे, दरोडा टाकण्यासाठी नियोजन होते आणि टोळी अटक केली जाते, हे चित्र शहरात पाहण्यास मिळत आहे. पोलीस खात्याला त्याचे सोयरसुतक राहिले नाही. भिती तर मग दुरचाच विषय बनला आहे. अशा कारवाईमुळे वस्त्रनगरी ही शस्त्रनगरी बनू लागली आहे.
कष्टकऱ्यांच्या हाताला काम आणि रोजगार (youth programs)देणाऱ्या इचलकरंजी शहरात कोणी उपाशी मरत नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वाढत चाललेली गुंडगिरी शहराला धोकादायक बनली आहे. किरकोळ कारणावरून खुनासाठी हत्यार उपसले जात आहेत. किरकोळ कारणावरून मुडदे पडत आहेत.
गुन्ह्यातील आरोपी सुटून आल्यानंतर राजरोसपणे फिरताना दिसतात. युवकांचा अशा आरोपींकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदललेला दिसत आहे. खून करणारे आरोपी आता नवीन पिढीचे आयकॉन बनत आहेत. आई वडील मोलमजुरी करतात. आपण ही काम करून कुटुंबाला हातभार लावण्यापेक्षा युवक गुन्हेगारीच्या विश्वात शिरत आहे. यांना पोसणारे काही व्हाईट कॉलर गुंड शहरांमध्ये आहेत.
मात्र अशा वाईट कॉलरच्या मुसक्या आवळण्यात पोलीसांना अद्याप यश आलेले नाही. शहरातील सर्वच पोलीस अधिकारी अपयशी ठरत असताना दिसत आहेत. युवकांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम करून घेणे आणि युवकांना गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकवणे हे काम वाईट कॉलर गुंड करीत आहेत आणि त्यातूनच एका खूनातून दुसरा खून होताना दिसत आहे.
अवैध व्यवसायातून मोठा पैसा मिळवून त्या पैशातून युवकांना नशेची चटक लावली जात आहे.व्यावसायिकांच्या संपर्कात आहेत याचा शोध घेणे आवश्यक आहे. भविष्याच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे, असे नागरिकांतून बोलले जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि राज्य सरकारने लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून एका चांगल्या अधिकाऱ्याला शहरात आणण्याच आवश्यकता बनली आहे. तरच शहरामध्ये शांतता नांदेल आणि कायदा सुव्यवस्थेचा उत्तम होईल, असे नागरिकांतून बोलले जात.
हेही वाचा :
इचलकरंजीत विजेच्या धक्क्याने शोरूममधील कर्मचाऱ्याचा मृत्यू
करण जोहरनं लग्न का केलं नाही? कारण सांगत म्हणाला…
कोल्हापूरात वाढला टक्का, कोणाला बसणार धक्का, लोकसभेच्या आडून विधानसभेवर नजर