संभाजी राजे छत्रपतींना अटक करा! मुस्लिम समाजाची मागणी

गेल्या काही दिवसांपासून शाहुवाडीतील किल्ला विशाळगडावरील बेकायदेशीर(community) अतिक्रमणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. विशाळगडावरील हे अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी संभाजी राजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर काल विशाळगड परिसरात दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील मुस्लिम समाजाकडून संभाजी राजेंना अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.

विशाळगडाच्या पायथ्याला झालेल्या तोडफोडीबद्दल कोल्हापूर (community)जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. गजापूर येथे काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संभाजी राजे छत्रपती यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. यासंबंधीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी गडावर सोडले नाही, यावेळी संतप्त जमावाने गडाला लागून असलेल्या गजापुरात काही घरे पेटवून दिली. तसेच गाड्यांवर तुफान दगडफेक करून काही चारचाकी गाड्या उलथून टाकल्या होत्या. यावेळी स्थानिकांनी त्यांना मारहाण झाल्याचा तसेच घरांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला होता.

विशाळगडावर सुमारे १५८ अतिक्रमणे आहेत. यापैकी सहा अतिक्रमणांबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. त्यामुळे ही न्यायालयीन वाद असलेली अतिक्रमणे सोडून अन्य अतिक्रमणे काढावीत, यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत.

काल झालेल्या या प्रकारानंतर अखेर विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचे सर्व प्रमुख अधिकारी विशाळगडावर दाखल झाले असून जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यासह प्रमुख अधिकारी विशाळगडावर पोहोचले आहेत. विशाळगडावरील अतिक्रमण केलेली दोन आस्थापने प्रशासनाने काढली आहेत.

हेही वाचा :

रत्नागिरीत डोंगर खचला; थरारक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

एका रसगुल्लाने घातला लग्नात गोंधळ, रंग बिघडला, मारामारी आणि दगडांचा पाऊस

विशाळगडावर अतिक्रमणे काढण्यास सुरुवात; जिल्हाधिकारी, एसपींसह प्रमुख अधिकारी गडावर