मुंबईतील जगप्रसिद्ध लालबागचा राजा (lord ganesha)यंदा ९१ व्या वर्षात पदार्पण करत आहे, आणि त्याची पहिली झलक पाहण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. नवसाला पावणाऱ्या या राजाची प्रतिष्ठा आणि भक्तांचा भक्तिभाव कायमच विशेष राहिला आहे. यंदा लालबागच्या राजाचं रूप अधिकच डोळे दिपवणारं आहे.
लालबागच्या राजाला यंदा मरून रंगाचं वेल्वेटचं पितांबर नेसवण्यात आलं आहे, ज्यामुळे त्याच्या शाही रूपात अधिक भर पडली आहे. याचसोबत काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवल्याने संपूर्ण गणेशोत्सव वातावरणात अध्यात्मिक रंग भरला आहे. विशेष म्हणजे, लालबागच्या राजाला अर्पण केलेला सोन्याचा मुकूट अनंत अंबानी यांच्या कडून भेट म्हणून दिला गेला आहे. या मुकुटाचं वजन तब्बल २० किलो असून, त्याची किंमत सुमारे १५ कोटी रुपये आहे.
हा मुकूट बनवण्यासाठी कुशल कारागिरांना दोन महिने लागले असल्याची माहिती मंडळाचे मानव सचिव सुधीर साळवी यांनी दिली आहे. या शाही मुकुटाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली आहे, आणि राजाच्या या आलिशान स्वरूपाचं दर्शन घेण्यासाठी भारतभरातून भाविक मुंबईत दाखल झाले आहेत.
लालबागचा राजा नेहमीच नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो, आणि यंदा त्याच्या शाही थाटात भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक असलेला हा मुकूट विशेष आकर्षण ठरत आहे.
हेही वाचा:
रवींद्र जडेजाची भाजपमध्ये एंट्री:पत्नी रिवाबाने दिला संकेत!
गणपती बाप्पासाठी तयार करा ‘नो कुक’ नारळ-मावा मोदक;