उद्योग विश्वाचा दीपस्तंभ विझला

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सभ्यता, उद्यमशीलता, विनयशीलता, सुसंस्कृत, दातृत्व, अशा प्रकारची विशेषणे ही कमी पडावीत अशा चारित्र्यसंपन्न रतन टाटा(business news) यांच्या निधनाने उद्योग विश्वाचा दीपस्तंभ बुधवारी रात्री विझला. त्यांच्या जाण्याने भारतासह संपूर्ण जग हळहळले. महाराष्ट्रासह देशाला विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या टाटा घराण्यातील रतन टाटा यांनी त्यांच्या जीवनशैलीने साऱ्या जगाला भारावून टाकले होते.

हिमालया एवढ्या उंचीचा हा माणूस पण त्यांचे पाय कायम जमिनीवर राहिले. साध्या नेहमीच्या चेकअपसाठी मी ब्रिज कँडी मध्ये ऍडमिट झालोय. चिंता करण्याची गरज नाही. ही त्यांची ही त्यांची गेल्या शुक्रवारची पोस्ट शेवटची ठरली. बुधवारी त्यांच्या एक्झिटची बातमी(business news) आली तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला. त्यांचे राहणीमान अतिशय साधे होते आणि म्हणूनच ते प्रत्येक भारतीयाला आपल्यातीलच एक वाटत होते.

टाटा म्हणजे विश्वास आणि टाटा म्हणजे गुणवत्ता या सर्व सामान्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही इतकी खबरदारी घेणाऱ्या रतन टाटा यांनी काही वर्षांपूर्वी त्यांचा भाचा सायरस मिस्त्री यांच्याकडे टाटा अँड सन्स ची सूत्रे सोपवली होती पण काही महिन्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की सायरसच्या हाती टाटा सन्स सुरक्षित नाही. त्यामुळे त्यांनी सायरस कडून सारे सूत्रे काढून घेतली. प्रकरण न्यायालयात पोहोचले. पण सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाला.

भारतातील सर्वसामान्य माणसाला परवडेल अशी अवघ्या एक लाखात ज्ञानोकार त्यांनी बाजारात आणली. सामान्य माणसाला विमानाने प्रवास करता यावा यासाठी ते स्वस्तातली विमानसेवा सुरू करणार होते. त्यासाठी त्यांनी 500 विमाने खरेदी करण्याची ऑर्डर ही नोंदवली होती. जे श्रीमंत लोक लाभ घेतात तोच लाभ सामान्य माणसालाही देता आला पाहिजे याचा ते कायम विचार करत असत. अलीकडच्या काळात ते अध्यात्माकडे वळले होते. पारशी धर्मियांच्या”अग्यारी”त
मांडी घालून बसलेल्या रतन टाटांची छायाचित्रे अनेकदा झळकली आहेत आणि ती करोडो लोकांनी पाहिले आहेत.

टाटा उद्योग समूह हा केवळ भारतातच नाही तर जवळपास 100 देशांमध्ये तो विस्तारलेला होता. म्हणूनच त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभर शोक व्यक्त करण्यात आला. अनेक देशांनी त्यांना तेथील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पद्म पुरस्कारांनी भारत सरकारने त्यांना गौरवले होते. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करावे अशी देशातील सर्वसामान्य जनतेची अशी इच्छा होती.

टाटा घराण्यातील जे आर डी टाटा यांना भारतरत्न या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. जे आर डी टाटा यांच्यानंतर टाटा उद्योग समूहाला तितक्याच उंचीवर नेऊन ठेवण्यात रतन टाटा यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. ते ताटाच्या कोणत्याही कंपनीत गेले तरी तेथे आपणाला विशेष आणि वेगळी वागणूक मिळता कामा नये किंबहुना मिळू नये असे त्यांचे व्यक्तिगत मत होते.

सर्वसामान्य कर्मचारी(business news) ज्या लिफ्टचा वापर करतात त्याच लिफ्टचा ते वापर करत असत. कोरोना काळात टाटा उद्योग समूहाने दीड हजार कोटी रुपयांची मदत शासनाला केली होती. याशिवाय इतर मदतही त्यांच्या सेवाभावी संस्थेकडून करण्यात आली होती. टाटा कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते तेव्हा तेथे रतन टाटा गेले होते. इतकेच नव्हे तर त्या कर्मचाऱ्यांच्या समवेत ते राहिले होते. म्हणूनच ते माणूस म्हणून फार मोठे होते.

सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून टाटा ने आपली अनेक उत्पादने बाजारात आणली होती आणि आहेत.
कोल्हापुरातील औद्योगिक वसाहतींना टाटा उद्योग समूहाकडून जॉब वर्क दिले जात होते. कोल्हापुरातील उद्योजकांनी त्यांची खास भेटही घेतली होती. कोल्हापूर विषयी त्यांना एक प्रकारचा जिव्हाळा होता.

रतन टाटा हे राजकारणापासून खूप दूर होते. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्यांची जवळीक नव्हती. मात्र सर्वच राजकीय नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. लक्षावधी हातांना काम देणारे, लक्षावधी रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देणारे, शेकडो सेवाभावी संस्थांना सढळ हाताने मदत करणारे, उद्योगातील नफा समाजाला देणारे, जे समाजाकडून मिळाले ते समाजाला परत केले पाहिजे असा विचार करणारे रतन टाटा जेव्हा बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेऊन अनंताच्या प्रवासाला गेले तेव्हा महाराष्ट्र आणि देश शोक सागरात बुडाला. एका अर्थाने त्यांना दीर्घायुष्य मिळाले. या दीर्घायुष्याचा फायदा त्यांनी समाजासाठी दिला. मी ठीक आहे, मी दवाखान्यातून डिस्चार्ज घेऊन पुन्हा येईन असे गेल्या शुक्रवारी ट्विट करणाऱ्या रतन टाटा यांनी कायमची एक्झिट घेतली तेव्हा तो सर्वांसाठी दुःखद धक्का होतात.

हेही वाचा:

‘सिंघम अगेन’च्या ट्रेलरमुळे दीपिका पदुकोण ट्रोल, अर्जून कपूरवरही भडकले प्रेक्षक

देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सरकारचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

मुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकार महामंडळ स्थापन करण्याची घोषणा; पत्रकार संघटनेचा पाठपुरावा यशस्वी