“नेत्याच्या मुलानं मला झाडाझुडपांत नेलं अन् माझ्यावर…”; अर्धनग्न अवस्थेत रस्त्यात बसून महिलेनं फोडला टाहो video

कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापूर चिमुकल्यांवरील(current political news) अत्याचार प्रकरण सातत्यानं समोर येणाऱ्या अशा घटनांमुळे अख्खा देश संतापला आहे. देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक आणि भयावह घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश गाझियाबादमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये एक महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर(current political news) बसलेली दिसत आहे. तुमच्यासोबत काही चुकीचं घडलंय का? असं कुणी एक व्यक्ती व्हिडीओमध्ये महिलेला विचारत असल्याचं पाहायला मिळतंय. यानंतर महिलेला त्या व्यक्तीला जे काही सांगतेय, ते फारच भयावह आणि संतापजनक आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली महिला सांगतेय की, माझ्यासोबत चुकीचं कृत्य झालं आहे. मला झाडाझुडपांत जबरदस्तीनं घेऊन जात, माझ्यासोबत बलात्कार करण्यात आला आहे. मी पोलिसांना देखील सांगितलं, पण त्यांनीही काहीच ऐकलं नाही, कारवाईसुद्धा केली नाही.”

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही घटना घडली. गाझियाबादमधील लाल कुआन चौकीजवळ दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेवरपीडित महिला अर्धनग्न अवस्थेत बसली होती. महिलेचा असा दावा आहे की, काही लोकांनी तिला जबरदस्तीनं नंदग्राम इथून उचलून झाडाझुडपांत नेलं, तिथे तिच्यावर बलात्कार करून रात्री उशिरा लाल कुआ परिसरात सोडलं.

महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसनंदेखील आपल्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसनं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय की, गाझियाबादच्या रस्त्यावर अर्धनग्न अवस्थेत बसलेली एक महिला म्हणतेय की, मी त्यांना सांगत होते, मला पाच मुलं आहेत, मला सोडा, पण नेत्याचा मुलगा मला झुडपात घेऊन गेला. दारूची बाटली उघडून ती पिऊन त्यानं माझ्यावर बलात्कार केला.”

उत्तर प्रदेश काँग्रेसनं पुढे लिहिलंय की, कोण आहेत नेताजी, ज्यांनी अशा मुलाला जन्म दिलाय? हे उघड व्हायला हवं आणि त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की, त्याला आपल्या आईच्या प्रेमाची किंमत समजेल…”

यूपी काँग्रेसने पुढे लिहिले आहे – हे किती मार्मिक आहे! एवढ्या मुलाला जन्म देणारे ते नेताजी कोण? हे उघड व्हायला हवे आणि त्याला इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की त्याला आपल्या आईच्या प्रेमाची किंमत समजेल.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम मिश्रा यांनी सांगितलं की, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला अर्धनग्न बसली आहे आणि ती काही आरोप करत आहे. या संदर्भात सखोल तपास केला असता चौकी परिसर, लाल कुआ पोलीस ठाणे, वेव्ह सिटी असं प्रकरण होते. यामध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यांनी महिलेशी बोलून तिची माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय अन्य माध्यमांच्या मदतीनं तिचं घर शोधून काढण्यात आलं आहे. तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे. कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे. यापूर्वीही ती अशाच पद्धतीनं हरिद्वार, रुरकी आदी ठिकाणी गेली होती. ती अचानक घरातून निघून जाते. महिलेला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची कारवाई करण्यात येत आहे.

हेही वाचा:

शिवप्रतिष्ठानकडून सांगली जिल्हा बंदचा निर्णय मागे

सरकारच्या निषेधार्थ महिला संतप्त, लाडकी बहीण योजनेचे पैसे केले परत

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश! शिंदे सरकारचा मोठा निर्णय