सिंहाचा रुद्रावतार! घरातून खेचत नेलं अन्… थरारक Video Viral

सिंहाला जंगलाचा राजा मानला जाते. त्याची ताकद इतकी आहे की त्याच्याशी इतर कोणताही प्राणी स्पर्धा करू शकत नाही. सोशल मीडियावर आपण अनेकदा शेराची शैली वेगवेगळ्या रूपात पाहतो. पण कधी कधी हे दृश्य धोकादायकही ठरतात. असाच एक व्हिडीओ(Video) नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून कुणाचाही थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये सिंह एका व्यक्तीला त्याच्या घरातून खेचत नेऊन त्याची शिकार करतो. हे दृश्य इतके भयानक वाटू लागते की ते पाहून आता अनेकांना धडकीच भरली आहे.

शिकारीचे अनेक थरारक व्हिडिओ(Video) यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र यात प्राण्यांच्या शिकारीचे दृश्ये दिसून आली. पण आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात चक्क एका माणसाची भीषणरित्या शिकार होताना दिसून आले आणि ही शिकार दुसरे तिसरे कोण नसून जंगलाच्या राजाने म्हणजेच सिंहाने केल्याचे समजत आहे. जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी म्हणून सिंहाची ओळख आहे अशात त्याच्या नादीला लागण आपल्याला फार महागात पडू शकत. याचेच जिवंत उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओतून पाहायला मिळेल.

लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती आपल्या काही मित्रांसह जंगलात असल्याचे दिसून येते. त्यानंतर सिंहाने त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. सिंहाने त्या माणसाला त्याच्या रडारवर पाहिले आणि त्याच्याकडे धावू लागला. माणूस घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण सिंह त्याला पकडतो आणि खेचून जंगलात घेऊन जातो. तो माणूस वारंवार घरात घुसण्याचा प्रयत्न करतो, पण सिंहाच्या हल्ल्यापुढे तो असहाय्य होतो. हे दृश्य पाहून सर्वच हादरतात पण कुणालाही काहीही करता येत नाही.

या धोकादायक हल्ल्याच्या वेळी आसपासचे लोक त्या व्यक्तीला मदतीसाठी आरडाओरड करत होते, मात्र सिंहाच्या ताकदीपुढे आणि वेगापुढे ते काही करू शकले नाहीत. या वेळी संपूर्ण परिस्थिती इतकी भयावह होती की लोक दुरूनच सिंहाचा हल्ला पाहत होते. त्या माणसाला वाचवण्याची हिंमत कोणी दाखवली नाही आणि सिंह त्याला जंगलाच्या आत ओढत घेऊन गेला.

शिकारीचा हा व्हिडिओ @kuldeep__singh_11 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सिंहाने माणसावर हल्ला केला’ असे लिहिण्यात आले आहे. अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “काही लोक व्हिडिओ बनवत आहेत जे त्याला वाचवू देखील शकले असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तो माणूस तिथे काय करण्यासाठी गेला होता?”.

हेही वाचा :

कोण म्हणतय “व्यवस्थे” समोर सर्वजण समान आहेत?

तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा, ठाकरे गटाची मागणी; पोलिसांत दिली तक्रार

कोल्हापूरात कर्जबाजारीमुळे नातवाने आजीचा गळा दाबून, डोके आपटून केला खून