राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची(current political news) सत्ता स्थापन झाली आहे. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आहे. यावेळी 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर दोन दिवस उलटले तरी देखील खातेवाटप झाले नाही. अशातच सध्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या दरम्यान विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक देखील पार पडली आहे. यावेळी भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
दरम्यान, आता विधानसभेच्या(current political news) विरोधी पक्षनेतेपदाबाबत नेमकं काय निर्णय होईल? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. परंतु, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय अधांतरी असताना आता आणखी एका मोठ्या पदाचा निर्णय झाला आहे. तसेच विधानपरिषदेच्या सभापती पदाची निवडणूक आता होणार आहे. या निवडणुकीसाठी राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात भाजप नेते राम शिंदे यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. तसेच भाजपकडे सध्या विधिमंडळात बहुमत आहे. तसेच दोन्ही सभागृहात महायुतीची सदस्य संख्या सर्वात जास्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेत देखील भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची सदस्य संख्या जास्त दिसून येत आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अगदी सहज जिंकून येण्याची शक्यता आहे.
भाजप नेते राम शिंदे यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाल्याने त्यांची निवड होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात राम शिंदे यांनी ट्विट करुन सर्वांचे आभार देखील मानले आहेत.
हेही वाचा :
चायनीज फूड ग्राइंडरमध्ये अडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, तडफडत राहिला जीव अन्… Video Viral
कोल्हापूरमार्गे सिंधुदुर्ग प्रवास फक्त एका तासांत पूर्ण होणार…
लालकृष्ण आडवाणी यांच्यावर ICU त उपचार सुरू, हेल्थबद्दल मोठी अपडेट समोर