कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बारामती, तिथली गोविंद बाग, पुण्यातील मोतीबाग, मुंबईतलं सिल्वर ओक आणि नवी दिल्लीतील “१० जनपथ” ही सर्व ठिकाणे बातम्या(news) देणारी म्हणून गेल्या काही वर्षांपासून ओळखली जातात. कारण या सर्व ठिकाणी शरद पवार हे अधून मधून येत असतात.
गुरुवार दिनांक 12 डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस होता. आणि ते नवी दिल्लीतील “10 जनपथ” या निवासस्थानी होते आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बडी बडी मंडळी येत जात होती. केंद्रीय गृहमंत्री अमित, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येऊन गेल्यानंतर काही जणांनी हवेतले पूल बांधण्याला सुरुवात केली होती.
अजितदादा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल वगैरे मंडळी नवी दिल्लीतील काही कामासाठी आली होती. ही सर्व मंडळी शुभेच्छा देण्यासाठी “दहा जनपथ”वर पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार. अजितदादा आणि शरद पवार यांच्या तर राजकीय चर्चा झाली. अशा हवेतल्या बातम्या(news) दिवसभर गुरुवारी छोट्या पडद्यावर नाचत होत्या. जणू काही तासाभरातच त्यांची एकी झाल्याची घोषणा होणार आहे. या हवेतल्या बातम्यांवर प्रतिक्रिया देण्यासाठी काहीजण अगदी उतावीळ झाले होते. रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही एकमेकांपासून दूर गेलेल्या पवार कुटुंबीयांनी एकत्र आले पाहिजे असे सांगितल्याने न होणाऱ्या गोष्टी होणारच असे अनेकांना वाटू लागले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर अप्रत्यक्षपणे शरद पवार हे भाजपमध्ये गेले असे म्हणता येईल अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी देऊन टाकली पण शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे पाईक आहेत ते भाजपामध्ये प्रत्यक्षही जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे केवळ शुभेच्छा देण्यासाठी दहा जनपथ वर गेले होते. पाठव फाटा नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शरद पवार हे भाजपमध्ये जाणार अशा हवेतल्या बातम्या येऊ लागल्या.
भाजपने पुन्हा एकदा”ऑपरेशन लोटस”सुरू केले आहे. भाजपला एनडीए मजबूत करायची आहे. सत्ता स्थिर ठेवायची आहे. त्यासाठी अजितदादांना”तुम्हास केंद्रात मंत्री पद हवे असेल तर शरद पवार गटाचे पाच हजार तुम्हाला फोडावे लागतील”असे सांगितले गेले आहे अशा बातम्यांनी गुरुवारी जनतेचे भरपूर मनोरंजन केले.
अजितदादा यांनी शरद पवारला भेटणे की पूर्णपणे कौटुंबिक पातळीवरची घटना होती. शरद पवार यांचा दिनांक 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो. आणि गुरुवारी योगायोगाने ते त्यांच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीसाठी नवी दिल्लीत होते. म्हणूनच त्यांचा वाढदिवस नवी दिल्ली येथे तलवारीने केक कापून साजरा करण्यात आला.
काही महिन्यापूर्वी शरद पवार आणि अजित दादा पवार यांची पुणे येथील उद्योजक चोरडिया यांच्या निवासस्थानी भोजनानिमित्ताने भेट झाली होती तेव्हाही हे दोघे पुन्हा एकत्र येणार अशा वावड्या हवेत उडवण्यात आल्या होत्या. नुकत्याच झालेल्या दिवाळीमध्ये अजित दादा पवार आणि शरद पवार यांचे दोन वेगवेगळे कार्यक्रम झाले होते. त्यामुळे हे दोन्ही गट भविष्यात एकत्र येण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे.
दोन तपापूर्वी शिवसेनेचे महाबळेश्वर येथे अधिवेशन झाले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांची शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हा राज ठाकरे हे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावाचा स्वतंत्र पक्ष काढला. पण हे दोघे बंधू योगायोगाने एकत्र आले तेव्हा तेव्हा या दोघा भावांनी एकत्र आले पाहिजे किंवा ते एकत्र येतील अशा स्वरूपाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
उद्धव ठाकरे यांच्यावर काही वर्षांपूर्वी एन्जोप्लास्टी झाली तेव्हा त्यांना दवाखान्यातून घरी नेण्यासाठी राज ठाकरे यांनी स्वतः गाडीचे सारथ्य केले होते. तेव्हाही हे दोघे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र या दोघांमधील मतभेदांची दरी अधिकाधिक रुंदावत गेली. आता तर त्यांच्यात कट्टर राजकीय शत्रुत्व निर्माण झाले आहे. एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणात बातम्यातली माणसे आणि बातम्या(news) पेरणारी माणसे आहेत.
हेही वाचा :
राजकारण तापणार; रेल्वेने नोटीस दिलेल्या हनुमान मंदिराल आदित्य ठाकरे भेट देणार
मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली
खूप कामाची आहे Flipkart ची VIP मेंबरशिप! मिळतात अनेक फायदे