‘हेलिकॉप्टरमधून ९ बॅगा, CM शिंदेंकडून १२- १३ कोटींचे वाटप’; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ

राज्यात एकीकडे निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे(security guards). आज चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. यादरम्यान ठाकरे गटाने नेते संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर एक पोस्ट केल्याने चर्चेला उधाण आलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकमध्ये जाताना आपल्यासोबत पैशांने भरलेल्या बॅगा(security guards) सोबत आणल्याचे संजय राऊतांनी म्हटले आहे. राज्यभरात भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप राज्यातील विरोधक करताना दिसत आहेत. अशातच आता संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या हेलिकॉप्टरमधून मतदारांना वाटण्यासाठी पैसे आणल्याचा आरोप केला आहे.

आज सकाळी(सोमवारी) संजय राऊत यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसतात. त्यांच्या संरक्षकांच्या हातात बॅगा देखील दिसतात. या व्हिडीओसोबत संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले.

नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलेले दिसत आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना दिसतात. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या अंगरक्षकांचा ताफा आहे. या ताफ्यातील दोन अंगरक्षकांच्या हातात सुटकेस आणि बॅग दिसत आहे. या बॅगांमध्ये नेमकं काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुख्यमंत्री दोन तासांच्या नाशिक दौऱ्यासाठी इतक्या बॅगा का घेऊन आले?, असा प्रश्न उपस्थित करत संजय राऊत यांनी पैसेवाटपाची शंका उपस्थित केली आहे.

हेही वाचा :

भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक Video

नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट दही सॅंडविच, जाणून घ्या ‘ही’ सोपी रेसिपी

क्रिकेटमधून टॉस होणार गायब; BCCI ने ठेवला नवा प्रस्ताव