सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असते. लहानांपासून(fan srk) मोठ्यांपर्यंत सगळेच वेगवेगळे कटेंट तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतात. अनेकदा असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्य वाटते. असे अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यांवर विश्वास बसत नाही. पण असेही व्हिडीओ व्हायरल होतात जो पाहिल्यावर हसू आवरत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहिल्यावर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाही.
शाहरूख खान(fan srk) तर सगळ्यांनाच आवडतो. लाखो लोक त्याचे चाहते आहेत. लहान, तरूण, वृद्ध असे एनेक लोकांना तो आवडतो. तुम्ही शाहरूख खानच्या फॅनचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात लोक त्याची फेमस पोज मारत व्हिडीओ बनवतात, तर कोणी त्याचे डायलॉग कॉपी करायचा प्रयत्न करतात. काहीजण त्याच्या सारखे दिसण्याचा देखील प्रयत्न करतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ असाच आहे. एका लहान मुलाने व्हिडीओसाठी शाहरूखची पोज दिली. पण पुढे असे काही झाले जे पाहून तुम्हाला हसू येईल.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मूल शाळेत जाण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. पण अचानक तो त्याच्या पाठीवरून बॅग काढून खाली ठेवतो आणि अभिनेता शाहरुख खानच्या प्रसिद्ध पोझ मारायला लागतो. तेव्हा त्याची आई त्याला मागून हे सर्व करताना पाहते. हे पाहून त्याची आई तिची चप्पल काढून त्याच्याकडे येते. आई येणार आहे याची मुलाला कल्पना नव्हती. मुलाची आई येताच त्याला चप्पल डोक्यात मारते. आणि मग नंतर खूप रागवते.
हा व्हिडिओ एक्सवर @JeetN25 नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे, ‘पट्ट से हेडशॉट.’ व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘भावाला आशीर्वाद मिळाला.’ तर आणखी एका यूजरने लिहिले की, ‘आईने फक्त एका चप्पलने सर्व तणाव दूर केला.’ तिसऱ्या यूजरने लिहिले की, ‘व्वा, आई ही आई असते.’ अजुन एकाने लिहिले आहे, ‘ती एक आई आहे, ती काहीही करू शकते.’
हेही वाचा :
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!
सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप
अल्पवयीन मुलगी गर्भवती! बदनामीच्या भितीने बापानेच केली गळा आवळून हत्या