ज्योतिष्य शास्त्रानुसार, दर महिन्याला ग्रहांच्या हालचालीमध्ये बदल होतात. डिसेंबर महिना सुरु असून या महिन्यात अनेक ग्रहांच्या(zodiac) हालचालीमध्ये बदल होतात. 2 डिसेंबर रोजी शुक्र, केतू आणि सूर्य या ग्रहांनी त्यांच्या स्थितीत बदल केला. तर 4 डिसेंबर रोजी म्हणजेच आज एकाच दिवशी चार प्रमुख ग्रहांपैकी दोन ग्रह दोन संयोग तयार करत आहेत. हे ग्रह म्हणजे बुध-गुरू आणि सूर्य-शनि आहेत.
वैदिक पंचांगानुसार, एकीकडे १८० अंशांवर राहून समसप्तक योग निर्माण होतोय. तर दुसरीकडे सूर्य आणि शनि एकमेकांपासून ९० अंशावर राहून केंद्र दृष्टी योग तयार करत आहेत. ज्योतिषांच्या मते या चार ग्रहांच्या हालचालीमुळे 5 राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या काळात कोणत्या(zodiac) राशींचं नशीब चमकणार आहे ते पाहूयात.
मेष रास
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ शुभ असू शकणार आहे. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. नवीन संधी उपलब्ध होतील आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे. गुंतवणुकीतून चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. जोडीदारासोबतचं नातं अधिक फुलणार आहे.
मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ सौभाग्य आणि समृद्धी वाढवणारा असणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळू शकतं. या काळात तुमच्या संपत्तीत वाढ होणार आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. तुमच्या पालकांचे आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत असतील. कुटुंबातून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे.
कर्क रास
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळा फार योग्य असणार आहे. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे.
या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.
हेही वाचा :
शरद पवार गटाचे खासदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणार! अर्जाची पडताळणी होणार सुरु?’
…म्हणून महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होणार 5 डिसेंबरला अन् तेही 5 वाजता