कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे(current political news) एक नेते बाबा सिद्दिकी यांची शनिवारी भर रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. या घटनेने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडणे स्वाभाविक होते. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे महायुती सरकारमधील एक ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेला केवळ ग्रह मंत्री जबाबदार नाहीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा जबाबदार असल्याचा घरचा आहेर दिला आहे.
गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत गेला, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना होत नाहीत असे निदर्शनास आल्यास गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली जाते. पण वाढत्या गुन्हेगारीची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा काळ, आता राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनिल देशमुख गृहमंत्री होते. तेव्हा पालघर मध्ये चार साधूंचे, ते चोर असल्याचे समजून हत्याकांड झाले होते. तेव्हा देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नव्हता हे इथे लक्षात घेतले पाहिजे.
मुळातच खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, वाटमारी, घरफोड्या, जबरी चोरी, बलात्कार, विनयभंग, अपहरण, खंडणी हे गुन्ह्याचे प्रकार व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. कोणतेही शासन हे गुन्हे बंद करू शकत नाही. मात्र विविध उपाय योजना करून हे गुन्हे नियंत्रणात आणता येऊ शकतात. हे सर्व गुन्हे व्यक्तिगत स्वरूपाचे असल्यामुळे पोलीस प्रशासनाला किंवा गृहमंत्र्यांना थेट जबाबदार धरता येत नाही.
मात्र समाजाविरुद्धचे गुन्हे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे मानले गेले आहेत. अशा प्रकारचे गुन्हे वाढले तर कायदा आणि सुव्यवस्था राहत नाही. त्याची जबाबदारी मात्र थेट शासनावर आणि पोलीस प्रशासनावर येते. अशा प्रकारचे सामाजिक गुन्हे वाढले तर गृहमंत्र्यांचाच नव्हे तर संपूर्ण सरकारचा राजीनामा मागण्याचा अधिकार लोकशाहीने दिलेला आहे. महाराष्ट्रात समाज आहे विरुद्धचे गुन्हे वाढलेले नाहीत आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही.
लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीचा महाराष्ट्राला(current political news) फारसा परिचय नव्हता. सलमान खान याला जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने दिल्या गेल्यानंतर, तसेच त्याच्या तो राहाच असलेल्या निवासी संकुलासमोर या टोळीच्या गुंडांनी हवेत फायरिंग केल्यानंतर या टोळीची दहशत महाराष्ट्राला समजली.
राजस्थानमध्ये एका हिंदी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता सलमान खान याने काळविटाची शिकार केल्यानंतर तो बिश्नोई टोळीच्या रडारवर आला. त्याच्या टोळीतील काही गुंडांना मुंबई पोलिसांनी अटकही केलेली आहे. पण या टोळीच्या कारवाया महाराष्ट्रात वाढू नयेत यासाठी ठोस उपाय योजना मुंबई पोलिसांनी प्रभावीपणे केली आहे असे म्हणता येणार नाही. सलमान खानचे जवळचे मित्र असलेले आणि हिंदी चित्रपट सृष्टीशी संबंधित असलेले माजी मंत्री आणि अजित दादा पवार गटाचे प्रभावी नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर बिश्नोई टोळीची दहशत किती आहे हे स्पष्ट झाले आहे.
हत्या झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अगदी तातडीने कारवाई करून या टोळीतील दोघा जणांना अटक केली आहे. शिवशंकर आणि धनराज कश्यप अशी त्यांची नावे आहेत. हरियाणा आणि उत्तर प्रदेश मधून मुंबईत आलेल्या बिश्नोई टोळीच्या शूटरना अगदी गतिमान हालचाली करून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. बिश्नोई टोळीचे हे चार गुंड गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत वास्तव्याला आहेत. त्यांनी बाबा सिद्दिकी यांचे निवासस्थान आणि कार्यालय यांची रेकी करून हा हल्ला केला आहे.
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या दोघा संशयीतांकडून इतर दोन आरोपींची तसेच त्याच्या मागच्या सूत्रधाराची नावे पुढे येतील. बिश्नोई टोळीने ह्या घटनेची जबाबदारी स्वीकारली असली तरी नेमका मेंदू शोधून काढण्याचे काम मुंबई पोलिसांना करावे लागणार आहे. या संशयीतांना अग्नि शस्त्र कुणी पुरवली? त्यांना फंडिंग कोणी केले? पुन्हा मार्फत केले? ते ज्या घरामध्ये भाडेतत्त्वावर राहत होते त्या घरमालकाने पोलिसांना नव्याने रहावयास आलेल्या या भाडेकरूंची माहिती पोलिसांना का दिली नाही?
बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यामागचा नेमका हेतू काय? त्यांच्या हेतूने बिश्नोई टोळीला काय साध्य करावयाचे होते? या अनेक प्रश्नांची उत्तरे तपास अधिकाऱ्यांना शोधावी लागणार आहेत. मुंबई पोलिसांनी सुद्धा किमान पातळीवरची गोपनीयता राखून कमाल पातळीवरची माहिती सर्व सामान्य जनतेला याप्रकरणी दिली पाहिजे.
सध्या गुजरातच्या(current political news) साबरमती कारागृहात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला मुंबईत आपले जाळे कायमस्वरूपी निर्माण करावयाचे आहे. दहशत निर्माण करावयाची आहे. आणि त्यातून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून खंडणीच्या माध्यमातून पैसा गोळा करावयाचा आहे. असे स्थूल मानाने म्हणता येईल अशी स्थिती आहे.बाबा सिद्दिकी यांची हत्या करून लॉरेन्स बिश्नोई टोळीला अभिनेता सलमान खान याला भयसूचक संदेश द्यायचा असावा. सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर सलमान खान याने आपली काही चित्रीकरणे थांबवलेली आहेत. त्याची स्वतःची अशी सुरक्षा व्यवस्था आहेच शिवाय आता मुंबई पोलिसांनाही त्याची सुरक्षा वाढवणे क्रमप्राप्त ठरले आहे.
बिश्नोई टोळीने बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मुंबई पोलिसांकडून कदाचित या टोळीचा ब्रेन लॉरेन्स बिश्नोई याला साबरमती तुरुंगातून ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे. मुंबई महानगराची लोकसंख्या दोन कोटीच्या पुढे आहे. आणि लोकसंख्येच्या तुलनेत गेल्या पंचवीस वर्षात मुंबईतील पोलीस ठाण्यांची संख्या 65 वरून 130 पर्यंत गेलेली असली तरी पोलीस बळ मात्र पुरेशा प्रमाणात नाही. हे वास्तव आहे. म्हणूनच स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलीस हा पूर्वीचा लौकिक आता राहिलेला नाही.
हेही वाचा:
विधानसभा निवडणुकीपूर्वीच राज्य सरकारचं मोठं गिफ्ट
घरात सुख-समृद्धी येण्यासाठी कोणती वास्तू आहे फायदेशीर?
‘गोव्याचे मुख्यमंत्री इथं येऊन भाजप नेत्याचे नाव जाहीर करत असेल, तर…’ मुश्रीफ कडाडले!