“राज्यातील जनता घरात बसलेल्यांच्या…”; मुख्यमंत्री शिंदेंचे सूचक वक्तव्य

मुंबई: काल हरयाणा आणि जम्मू-कश्मीर राज्यांच्या विधानसभा(Political) निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीपूर्वी हरयाणात काँग्रेसचा विजय होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत होती. पण हरयाणात एक्झिट पोलचे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपने बहुमताचा आकडा गाठत दणदणीत विजय मिळवला आहे.

ज्यात विधानसभा (Political)निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात. राजकीय पक्षांच्या जोरदार मोर्चेबांधण, सभा, बैठका, दौरे, मेळाव्यांची लगबग सुरू आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “हरयाणामध्ये विकास जिंकला आहे. महाराष्ट्रात सुद्धा विकासनीती आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना बंद असलेले कोस्टल रोड, अटल सेतु, समृद्धी महामार्ग, मेट्रो ३ असे अनेक प्रकल्प आम्ही सुरू केले. एकीकडे अनेक उद्योग आणले, कल्याणकारी योजना आणल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, मुलीना मोफत उच्च शिक्षण, बळीराजाला वीज बिल माफी केली. महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकाळात काय केले हे त्यांनी सांगावे.”

जातिवाद हारा, विकास जीता..

डबल इंजन की विजयी दौड़ जारी

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ” महाविकास आघाडीने त्यांच्या कार्यकाळात काय केले हे त्यांनी सांगावे. आमचा लेखा-जोखा आम्ही जनतेसमोर मांडू. तिथे दूध का दूध आणि पानी का पानी होऊ दे. हरयाणामध्ये विकासावर मतदान झाले. हरयाणात जातीवादाचा प्रभाव जल आहे तर विकास जिंकला आहे.

महाराष्ट्रात विकासाच्या मुद्द्यावर महायुती जिंकेल. महाराष्ट्राची जनता विकास करणाऱ्यांच्या, फील्डवर काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार. जनता फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांच्या आणि घरात बसलेल्यांच्या पाठीशी उभी राहणार नाही. ”

महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये मोठी फाईट होणार आहे. महायुतीलील तीन पक्ष आणि महाविकास आघाडीतील तीन पक्षांची लढत होणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे एकाच मतदारसंघात प्रतिस्पर्धी एकाच आघाडीतल असणार आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडखोरीही होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, मतदारांसमोर बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या तिसऱ्या आघाडीचा पर्यायही मतदारांना मिळणार आहे. त्यात मनोज जरांगे पाटलांनाही सोबत घेण्यासाठी तिसऱ्या आघाडीकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीवरही याचा परिणाम होणार असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा:

‘…म्हणून बाबा सिद्दीकीची हत्या केली’,; बिश्नोई गँगच्या खुलाशाने सगळीकडे खळबळ

विना ड्रायव्हर जळती कार रस्त्यावर धावू लागली, लोकांचा उडाला थरकाप, Video Viral

विमान प्रवास झाला स्वस्त, दिवाळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी