पटना : मागील काही महिन्यांपूर्वी लोकसभा(political) निवडणूका पार पडल्या. त्यानंतर केंद्रामध्ये मोदी सरकार स्थापन झाले. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. पण यंदा भाजपकडून 400 पारची घोषणा देण्यात आली होती. मात्र भाजपला स्वबऴावर सत्ता स्थापन करण्यात अपयश आले.
त्यामुळे आत्ताचे मोदी सरकार(political)हे मित्रपक्षांनी साथ सोडल्यास कधीही कोसळू शकते. त्यामुळे याबाबत मोदी सरकारवर टांगती तलवार आहे. यामध्येच आता भाजपच्या मित्रपक्षातील सर्वांत लोकप्रिय तरुण नेता असलेल्या चिराग पासवान यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आता मोदी सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली असल्याची चर्चा आहे.
बिहारची राजधानी पटनामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री आणि अत्यंत लोकप्रिय असलेले नेते चिराग पासवान यांनी भाषण केले. त्यांच्या या भाषणामध्ये बंड करणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी थेट मंत्रिपदाला लाथ मारण्याची भाषा केली आहे. लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी झारखंड विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. चिराग यांनी झारखंड विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हा भाजपाला थेट इशारा असल्याचे बोलले जात आहे.
सभेमध्ये बोलताना केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले की, “मी कोणत्याही आघाडीत असो वा मंत्रिपदावर असो जेव्हा संविधान आणि आरक्षणाच्या विरोधात कट कारस्थान होतंय असं मला वाटेल तेव्हा मी मंत्रीपदाला लाथ मारून निघून जाईल. माझ्या वडिलांनी जसं केलं होतं, तसंच मी करेन,” असे वक्तव्य चिराग पासवान यांनी केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
“लोकजनशक्ती पार्टीला मजबूत जनाधार आहे. त्यामुळे आपण राज्यातील इतर आघाड्यांशीही युती करण्याचा पर्याय ठेवला आहे. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा झारखंड बिहारमध्येच होतं. झारखंड ही माझ्या वडिलांची कर्मभूमी होती. या राज्यात आमचा मोठा जनाधार आहे. त्यामुळेच निवडणुका लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे,” असे देखील मत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा:
2 ऑक्टोबरला ‘गांधी जयंती’ला Share Market बंद राहणार की सुरु?
आठ तासांत मी 10 हजार फाईलींवर सह्या करतो, लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय राहणार नाही
यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचं; अमित शाहा