प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मंगळवारी कोल्हापूर(highway) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. दसरा चौकातून निघालेल्या सर्वपक्षी मोर्चामध्ये शेतकऱ्यांची शक्ती एकवटली होती. परिसर उद्ध्वस्त करणारा महापुराला निमंत्रण देणारा हा शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा अशा घोषणांनी परिसर दणाणून निघाला. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या मोर्चाचे आयोजन केले होते.
सकाळपासूनच मोर्चात सहभागी(highway) होण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागांतून शेतकरी दसरा चौकात येऊ लागले होते. हजारो शेतकरी येथे जमल्यानंतर शक्तिपीठ विरोधात घोषणाबाजी सुरू झाली.
मोर्चाची ताकद कमी व्हावी यासाठी पोलिसांनी आंदोलकांना नोटीसा दिल्या होत्या. मात्र त्याला न जुमानता आंदोलक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये उतरले होते.
मोर्चात खासदार शाहू महाराज छत्रपती,आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजू आवळे, गिरीश फोंडे समन्वयक, संजय बाबा घाटगे, भारत पाटणकर, शिवसेनेचे उपनेते संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे, सम्राट मोरे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
हेही वाचा :
महायुतीच्या रंगमंचावरचे एक अस्वस्थ पात्र : भुजबळ
दोघात नको तिसरा, आता दादांना विसरा! भाजपमध्ये वाढतंय ‘त्या’ नेत्यांचं बळ
हे सरकार फक्त 6-8 महिने, नोव्हेंबरला मविआचं सरकार सत्तेत आणायचंय; आदित्य ठाकरेंनी रणशिंग फुंकलं