BSNL’च्या रिचार्जची नाही वाढणार किंमत! सर्वात स्वस्त असेल 4G-5G सर्व्हिस

जिओ, एअरटेलसारख्या प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या(recharge) किमती वाढवल्यानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. त्यानंतर आता युजर्सची अनुभव आणखीन सुलभ करण्यासाठी बीएसएनएलने देखील आपल्या सर्व्हिस वेगवान करण्याचा निर्णय घेतला. लवकरच बीएसएनएल आपली 5G सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यांनतर आता बीएसएनएलदेखील किमती वाढवणार का असा प्रश्न ऐरणीवर होता.

भारत संचार निगम लिमिटेड ने रिचार्ज(recharge) प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे आता स्पष्ट केले आहे. असे मानले जात होते की 4G आणि 5G च्या रोलआउटनंतर, BSNL रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात. परंतु बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी रॉबर्ट रवी यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनीचा दर वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या BSNL सर्वात कमी किमतीत कॉलिंग आणि इंटरनेट सर्व्हिस देत आहे. तथापि बीएसएनएलची 3G सेवा उपस्थित आहे.

बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी रॉबर्टने नजीकच्या भविष्यात फी वाढीची गरज भासत नसल्याचे सांगितले. बीएसएनएलचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारतातील रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या खासगी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे.

बीएसएनएल लवकरच भारतात 5G सर्व्हिस सुरू करणार आहे. कंपनीने 5G ची यशस्वी चाचणी केली आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 2025 च्या मध्यापर्यंत देशभरात 1,00,000 BSNL 4G साइट्स लाइव्ह केल्या जातील. यानंतर ते 5G कनेक्टिव्हिटीवर शिफ्ट केले जाईल. मंत्र्यांवर विश्वास ठेवला तर बीएसएनएलमध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडचे युग सुरूच राहणार आहे.

हेही वाचा:

फोनच्या नादात 7 तास दरीत उलटी लटकली; शर्थीच्या प्रयत्नांनंतर तरुणीची सुखरूप सुटका!

अजित पवार बारामतीतून लढणार; राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी घोषित

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा: OTT वर धमाकेदार सस्पेन्स, थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपटांची लयलूट!