सध्या सोशल मिडियावर बच्चन कुटुंब चांगलेच चर्चेत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मिडियावर रंगल्या आहेत. अशात आता(Entertainment news) ऐश्वर्या रायचा मेकअप आर्टिस्टसोबतचा एक फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या रायचा (Entertainment news)तिच्या नव्या चित्रपटाच्या सेटवरूनचा जबरदस्त सेल्फी व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती मेकअप आर्टिस्टसोबत दिसत आहे. हा फोटो सोशल मिडियावर तिच्या मेकअप आर्टिस्टने शेअर केला आहे. त्याने या फोटोला एक हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, “शेवटी आमची राणी कामावर परतली…खूप आनंद…” या फोटोवर तुफान लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
ऐश्वर्या रायचा हा नवा प्रोजेक्ट कोणता याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे. तसेच तिचे एका जाहिरातीसाठी हे शूट चालले आहे. अशी चर्चा देखील सोशल मिडियावर चांगली रंगली आहे.
Finally our queen is Back to work
— Aishwarya Rai Fan (@in_aishwarya) November 30, 2024
So happy for you Queen #AishwaryaRai pic.twitter.com/3VKmlldoPE
ऐश्वर्या रायने अनेक हिट चित्रपट केले आहेत. तिच्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या रायने अलीकडेच एका कार्यक्रमात आपल्या नावापुढे असलेले बच्चन आडनाव हटवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या नात्यात खरच काहीतरी बिघडलं असल्याच्य चर्चांना उधाण आले आहे. ऐश्वर्याचा नवीन चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहे.
हेही वाचा :
अरविंद केजरीवालांवर जीवघेणा हल्ला; दिल्लीत नेमकं झालं काय?
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत
महाराष्ट्रात 6 महिन्यांत 42 लाख मतदार कसे वाढले? ‘त्या’ 13 लाख मतांचं गूढ काय? आव्हाडांची भलीमोठी पोस्ट