राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आजपासून पावसाने(districts) पुन्हा हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील अनेक भागात सध्या सकाळीच पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाला होता, मात्र गेल्या 24 तासांत अनेक ठिकाणी रिमझिम पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे.
आज हवामान विभागाने काही ठिकाणी यलो अलर्ट(districts)दिला आहे. आज (17 ऑगस्ट) मुंबई, ठाण्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान येथे अनुक्रमे 33°C आणि 26°C च्या आसपास असेल.
दुसरीकडे, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग, खानदेशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धारशिव या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
याचबरोबर विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा :
आईचा विरह असह्य झाल्यामुळं कोल्हापुरात उच्चशिक्षित भाऊ- बहिणीनं संपवलं आयुष्य
धोनीसाठी कायपण! CSK ला लवकरच मिळणार खुशखबर?
अवघ्या काही तासांतच शनी बदलणार चाल! ‘या’ 4 राशी होतील मालामाल…