विशाल पाटलांच्या बंडखोरीनं ठाकरे गटाची डोकेदुखी वाढली, संजयकाकांना फायदा होणार?

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू(headache) विशाल पाटील यांनी सोमवारी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर, आज मंगळवारी शक्तीप्रदर्शन करत ( 16 एप्रिल ) अतिरिक्त अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात विशाल पाटलांनी बंडखोरी केली आहे. या बंडामुळे शिवसेनेची ( ठाकरे गट ) डोकेदुखी वाढली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून(headache) महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेले काँग्रेस आणि शिवसेना ( ठाकरे गट ) आमने-सामने आले आहेत. सांगली मतदारसंघ जागावाटपात मिळावा म्हणून काँग्रेस नेत्यांनी अतोनात प्रयत्न केले. सांगली जिल्ह्यातील नेते, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी दिल्लीलाही फेऱ्या मारल्या होत्या. पण, शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवर ठाम राहिल्यानं काँग्रेसला सांगलीच्या जागा सोडावी लागली.

सांगली हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ. पण, सांगलीची जागा शिवसेनेला गेल्यानं विशाल पाटील यांनी अखेर बंडखोरी केली. सोमवारी एकीकडे महाविकास आघाडीचा मेळावा सुरू असतानाच विशाल पाटील यांनी गाजावाज न करता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आज ते अतिरिक्त अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहेत.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आली आहे. शिवसेनेनं येथून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर दिली आहे. तर, भाजपकडून संजयकाका पाटील यांना सलग तिसऱ्यांदा तिकीट देण्यात आलं आहे. त्यामुळे विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढविण्यावर ठाम राहिले, तर सांगलीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

2019 च्या सांगली लोकसभेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मिळाली होती. त्यामुळे विशाल पाटील स्वाभिमानीच्या तिकीटावर निवडणूक लढले होते. भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यात कडवी झुंज झाली होती. संजयकाका पाटील यांना 5 लाख 8 हजार 995 मते मिळाली होती. तर, विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 मते मिळालेली. वंचितचे उमेदवार गोपीचंड पडळकर यांना 3 लाख 234 मतं मिळाली होती.

काँग्रेसची मते विशाल पाटलांना मिळाली, तर याचा फटका चंद्रहार पाटील यांना बसण्याची शक्यता आहे. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे विशाल पाटलांचे बंड थोपवण्यास काँग्रेस यशस्वी होते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

विशाल पाटलांच्या बंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आघाडीत सर्वांचं समाधान होत नाही. सांगलीच्या जागेसाठी शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न केला. पण, शेवटी मैत्रीत किती ताणायचं हा प्रश्न निर्माण होतो. महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत जास्त भांडणं चालू आहेत. त्यामुळे सांगलीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करण्यात येईल, असं वातावरण आम्ही निर्माण करू,” असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.

हेही वाचा :

भाजपला मोठं खिंडार पडणार? शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत

कोल्हापुरात महायुतीचा मास्टरप्लॅन, तटबंदी केली भक्कम

भारीच! रात्री १२ वाजता बर्थडे विश करण्याचं टेन्शन मिटलं; जाणून घ्या काय आहे फोनमधलं नवीन फीचर