राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात

काही निवडणुका राजकीय(political) नेत्यांच्या कारकीर्दी घडवणाऱ्या किंवा बिघडवणाऱ्या असतात. महाराष्ट्रातील बदललेल्या समिकरणांमुळे ही निवडणूक महाराष्ट्रातल्या काही नेत्यांच्या कारकीर्दीतली टर्निंग पॉईंट ठरेल अशी स्थिती आहे. यावेळी राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच बड्या नेत्यांचं नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचंही दिसतंय.

राजकारणातील(political) मोठे घराणे आणि राजकीय पक्षांचे प्रमुख असलेल्या पवार, ठाकरे, कुटुंबातीलही सदस्य मैदानात उतरले आहेत. अनेक मतदारसंघातून भाऊ-भाऊ आणि बहिण भाऊ निवडणूक लढवत आहेत. मुंबईतून दोन ठाकरे मैदानात असून अमित ठाकरे माहीम मतदारसंघातून यंदा प्रथमच निवडणूक लढवत आहेत. तर, शिवसेना युबीटी आमदार आदित्य ठाकरे हे दुसऱ्यांदा वरळीतून निवडणूक लढवत आहेत. यामुळे दोन्ही ठाकरेंसाठी देखील ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे.

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशीच लढत होत आहे. या मतदारसंघात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीचे उमेदवार असून त्यांच्याविरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीकडून मैदानात आहेत. या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.

अजित पवारांचा पराभव झाल्यास हा अजित पवारांसाठी मोठा धक्का असणार आहे. आपल्या काकांविरुद्ध बंड करुन त्यांनीही भाजपसोबत मैत्रीची वेगळी चूल मांडली. काहींचा पाठिंबा मिळाला, तर काहींचा रोष. त्यामुळेच आपला स्वतंत्र जाण्याचा निर्णय अजित पवारांनी या निवडणुकीत पणाला लावला आहे.

कोकणताील दोन्ही राणे बंधुही यंदा मैदानात आहेत, कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपने नितेश राणे यांना उमेदवार दिली आहे. येथे शिवसेना ठाकरे गटाने संदेश पारकर यांना तिकीट दिलं आहे. तर, निलेश राणे यांना कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्र मैदानात आहेत. लातूर शहर मतदारसंघातून विद्यमान आमदार अमित देशमुख आहेत.

शरद पवारांची साथ सोडल्यानंतर दिलीप वळसे पाटील पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. अजित पवार यांनी त्यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात देवदत्त निकम यांना मैदानात उतरवलं आहे.

याशिवाय शरद पवारांनी दिलीप वळसेंविरोधात सभा घेत, त्यांना पाडण्याचं देखील आवाहन केलं आहे. निकाल वळसे पाटलांच्या विरोधात लागला नक्कीच मंत्री राहिलेल्या वळसे पाटलांचं राजकीय भवितव्य धोक्यात येणार असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीतील बंडखोरी केलेले धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, चेतन तुपे, यांचं भवितव्य आजचा निकाल ठरवणार आहे.

हेही वाचा :

“शिल्पा शेट्टीवरील 11 वर्षे जुन्या खटल्यात न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!”

17 वर्षांच्या मुलाला सेहवाग घेणार होता 3.5 कोटींची फेरारी

“नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! स्टॅंडर्ड डिडक्शन वाढून होणार ‘इतके’ लाख?”