विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामा देणार!

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून(mla citations) आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. 18 व्या लोकसभा निवडणुकीत मराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. तर, महायुतीचे 17 उमेदवार विजयी झाले आहे. सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी विजय मिळवला असून काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. त्यामुळे, आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र, या 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, या सर्वच आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यापैकी, 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांची(mla citations) घोषणा पुढील 4 ते 5 महिन्यात होणार आहे. त्यामुळे, सर्वांनाच विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय पक्षांचा फोकस विधानसभेकडे आहे. त्यातच, नवनिर्वाचित खासदार बनलेल्या आमदारांनी आता आपला राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. दोन विधानसभा आमदारांनी पदाचा राजीनामा दिला असून आणखी 4 आमदार राजीनामा देणार असल्याची माहिती आहे.

राज्यातील 7 विद्यमान आमदारांना खासदार झाल्यामुळे 20 जूनपर्यंत आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे, आत्तापर्यंत काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे व बळवंत वानखेडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. अद्याप आमदार रविंद्र वायकर, वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर व मंत्री संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे, हे उर्वरीत 5 आमदारही लवकरच राजीनामा देतील, असे दिसून येते.

राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाल्या आहेत. तर, बळवंत वानखेडे हे दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होते, त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून 19731 मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला आहे. त्यामुळे, हे दोन्ही आमदार आता खासदार बनून दिल्लीत जात आहेत.

विदर्भातील वर्धा विधानसभा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर आमदार होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात पराभव केला. तर, मराठवाड्यातील संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवत ते खासदार झाले आहेत. तर, आमदार कल्याण काळे यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघात पराभव केला.

कल्याण काळे यांना 607897 मतं मिळाली. काळे यांनी दानवे यांचा 109958 मतांनी पराभव केला. मुंबईत शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली. रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला. काँग्रेस नेत्या आणि आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना पराभूत केलं आहे.

हेही वाचा :

सांगलीत 50 रुपयांच्या बनावट नोटांचा सुळसुळाट, एक नोट 70 रुपयांना

मनोज जरांगे ‘किंगमेकर’; शरद पवार गटाच्या खासदाराच्या बॅनरवर झळकला फोटो

चंद्रकांत पाटील ‘ॲक्टिव्ह मोड’वर, मंडलिकांच्या पराभवाची कारण शोधण्यासाठी बैठकांचा धडाका