मुंबईच्या गोवंडी येथील शिवाजीनगरमध्ये एक हृदय पिळवटणारी घटना(rope) समोर आली आहे. 7 वर्षांच्या आकृती सिंह या मुलीला भावडांसोबत खेळत असताना दोरीचा फास लागला. भावडांना ही बाब लक्षात येईपर्यंत उशीर झाला होता. त्यांच्या आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेतली.
मुलीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात(rope) नेण्यात आले. पण तिथे पोहोचण्याआधीच तिची प्राणज्योत मालवली होती. या घटनेच्या वेळी घरात कोणीही वडीलधारी मंडळी नव्हती. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. थोड्यावेळापूर्वी आपल्याशी खेळणारी बहिण गेल्याने भावडांना मोठा धक्का बसला आहे.
काळाने साधला डाव:
रविवार असल्याने मुलांचा दंगा सुरु होता. घरातील वडीलधारी मंडळी बाहेर असल्याने मुलांची मस्ती सुरु होती. बैंगवाडी येथे रविवारी दुपारी बाराच्या सुमारास आकृती सिंह तिची भावंडे आणि शेजारील एका मुलीबरोबर लपाछपी खेळत होती. खेळाच्या ओघात आकृती पोटमाळ्यावर लपली होती. पोटमाळ्यावरून उतरताना दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकला आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात घडली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.
अंदाज हुकला आणि गळफास लागला:
घरातील इतर सदस्य बाहेर गेले होते, त्यामुळे घरात चार मुलेच होती. त्यांच्या लपाछपीच्या खेळात आकृती पोटमाळ्यावर लपली होती. पोटमाळ्यावरून खाली उतरण्यासाठी लावलेल्या शिडीच्या दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकला. ही बाब लक्षात येताच मुलीच्या मोठ्या बहिणीने तत्काळ घराबाहेर धाव घेत शेजाऱ्यांना घटना सांगितली. शेजाऱ्यांनी तिला खाली घेत तात्काळ रुग्णालयात नेले, पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
शिवाजी नगर पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलीच्या भावंडांना आणि कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा :
आजोबा जोमात वऱ्हाडी कोमात, काठी न घोंगड गाण्यावर केला जबरदस्त डान्स; VIDEO
धोनी खेळणार पुढील आयपीएल? बीसीसीआयच्या एका निर्णयामुळे माही आणखी खेळताना दिसणार
माझी हत्या झाली तरी चालेल, पण एकनाथ शिंदेंना सोडणार नाही; शिवसेना आमदाराची खळबळजनक पोस्ट