अठराव्या लोकसभेचा सत्ताधारी आज ठरणार;

लोकशाहीचा महान उत्सव म्हटल्या जाणाऱ्या सन २०२४ (celebration)च्या सार्वत्रिक निवडणुकांची आज, मंगळवारी मतमोजणी होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी निवडणूक आयोगाने सोमवारी पूर्णत्वास नेली आहे. राज्य निवडणूक आयोगांना मतमोजणीबाबत विशेष सूचना देण्यात आल्या असून, दुपारपर्यंत देशाचा कौल कोणाला, याचे चित्र स्पष्ट होईल.

नवी दिल्ली : गेल्या ८० दिवसांच्या निवडणूक प्रक्रियेनंतर निवडणुकीच्या आखाड्यातील ५१ पक्षांच्या ८,३६० उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. अठराव्या लोकसभेसाठी (celebration)प्रदीर्घ अशा सात टप्प्यांत मतदान झाल्यानंतर आता निवडणूक निकालांची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’ व दुसऱ्या बाजूला कांग्रेससह विरोधकांची ‘इंडिया आघाडी’ यांच्यात सत्तेसाठी थेट महामुकाबला होत आहे.

आज, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात करणार आहे. आधी टपाल मतांची आणि नंतर ‘ईव्हीएम’मधील मतांची मोजणी केली जाईल. लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांचे निकालही जाहीर होणार आहेत.

दिल्लीतील भाजप मुख्यालयांत मतमोजणीसाठी प्रचंड उत्साह दिसत आहे. मतदानोत्तर चाचण्यांनुसारच निकाल लागले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी दीनदयाळ उपाध्याय मार्गावर आधी ‘रोड शो’ करतील व नंतर सायंकाळी भाजप मुख्यालयात जमलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील, असे नियोजन आहे. पक्षप्रवक्ते, पत्रकार यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष सज्ज झाले आहेत.

दरम्यान, दिल्लीच्या सात जागांच्या बहुप्रतीक्षित निकालाबाबतही निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मतदारसंघाचे आकारमान, झालेले मतदान यांच्या आधारे नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे निकाल सर्वात आधी समोर येतील अशी अपेक्षा आहे. नवी दिल्लीत मतदारांची संख्या आणि मतदानाची टक्केवारीही दिल्लीत सर्वांत कमी असल्यामुळे जास्तीत जास्त १५ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे. भाजपच्या बासुरी स्वराज व आप-काँग्रेस आघाडीचे सोमनाथ भारती यांच्यात येथे थेट लढत असून, स्वराज यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसले. दिल्लीच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सरासरी १० विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी १० स्वतंत्र कक्षांमध्ये केली जाईल.

नाशिक : नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील कोणता शिलेदार दिल्लीदरबारी जाणार, याचा फैसला आज मंगळवारी (दि.४) होणार आहे. कोणते कर्मचारी कोणत्या विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे काम करणार हे सोमवारी सरमिसळ (रँडमायजेशन) प्रक्रियेद्वारे निश्चित करण्यात आले. नाशिकमधील ३१, तर दिंडोरीतील दहा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीममध्ये बंद असून, मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिला, याचा फैसला काही तासांत मतमोजणीद्वारे होणार आहे. खासदार म्हणून कोण दिल्लीत जाणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. दिंडोरीचा निकाल दुपारी तीनपर्यंत, तर नाशिकचा निकाल सायंकाळी साडेपाच- सहापर्यंत हाती येईल, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला.

हेही वाचा :

मध्यवर्ती कळंबा कारागृहात वर्षभरात झाल्या दोन हत्या!

भर पार्टीत जान्हवी कपूरने बॉयफ्रेंडला भरवला घास : Video Viral

चुकीला माफी नाहीचं! डॉन अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दणका