यांचेही संशयाचे “राज”कारण

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत(latest politcial news) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सपशेल पराभव झाला. एकाही उमेदवाराच्या घराला विजयाचे तोरण लागले नाही. शिवतीर्थही त्यास अपवाद नव्हते. निवडणूक निकालानंतर प्रतिक्रियेच्या माध्यमातून तेव्हा व्यक्त न झालेले मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी त्यावर बोलते झाले. महायुतीचा महाविजय होऊ नाही महा जल्लोष महाराष्ट्रात झाला नाही. काहीतरी नक्की गडबड झाली आहे.

आमची मते कुठे गायब झाली? मनसेच्या उमेदवाराला त्याच्याच गावात फक्त त्याचेच एक मत मिळते हे कसे काय? अशा शंका बोलून दाखवत राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक निकालाबद्दल संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या या उशिराच्या व्यक्त होण्याने ईव्हीएम बद्दल संशय व्यक्त करणाऱ्यांचे आता एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

गुरुवारी वरळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी त्यांच्या खास ठाकरे शैलीत काही खुलासे केले. किडीच्या नोटीसीला घाबरून भाजपच्या(latest politcial news) आणि नरेंद्र मोदींच्या प्रभावाखाली गेले या सततच्या टीकेला त्यांनी सविस्तर उत्तर यावेळी दिले. माझ्यासाठी ईडीची नोटीस हा किरकोळ प्रकार होता. त्याला घाबरून जाण्याचा मी नाही असा प्रथमच खुळासा करताना त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सुद्धा दिली.

सर्वोच्च न्यायालयाचा दाखला देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लगेच होणार नाहीत. त्या आता ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत पुढे जातील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच पैसे खर्च करण्याची गरज नाही हे त्यांनी सांगितले. पण या निवडणुकांमध्ये मनसेची रणनीती काय असेल? ते स्वबळावर लढणार की कुणाशी हात मिळवणी करणार हे मात्र त्यांनी या मेळाव्यात सांगितले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा मेळावा हा खुलासे करण्यासाठी, ईव्हीएम बद्दल संशय घेण्यासाठीच होता हे उघड झाले आहे.

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत वगैरे अनेक मंडळींनी महायुतीच्या महाविद्यायाचे श्रेय ईव्हीएम मशीनला दिले आहे. निवडणूक निकालाबद्दल संशय घेण्यासाठी आता राज ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका नेत्याच्या”इतना सन्नाटा क्यों है भाई?”या उद्गाराचा आधार घेतला आहे. या निकालाबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा सुद्धा अचंबित झाला आहे हे त्याच्या उद्गारावरून सिद्ध करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला दिसतो. त्यांनी या मेळाव्यात आपल्या मुलाच्या पराभव बद्दल काही भाष्य केले नाही.

राजू पाटील हे माजी आमदार. त्यांच्या जन्म गावात त्यांना फक्त एकच मत कसे काय पडू शकते? काँग्रेसचे बाळासाहेब थोरात पूर्वी 70 ते 80 हजार मतांचे अधिक्य घेऊन निवडून येत असत, त्यांचा दहा हजार मतांनी पराभव कसा काय होऊ शकतो? 2014 मध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या, 2024 च्या निवडणुकीत त्या 132 झाल्या हे मी समजू शकतो पण अजितदादा गटाचे 43 आमदार कसे काय येऊ शकतात? शरद पवार यांना, तसेच काँग्रेसला कमी जागा कशा मिळतात? असे प्रश्न उपस्थित करताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाचे नाव मात्र घेतले नाही.

महायुती मधील घटक पक्षांचे काही आमदार निवडून आले आहेत त्यापैकी बऱ्याच जणांना आपण कसे काय निवडून आलो याचेच आश्चर्य आजही वाटते आहे, हे ते आणि इतर राजकारणी(latest politcial news) नेमक्या कशाच्या आधारावर बोलतात हे कळावयास मार्ग नाही. महायुतीला महाविजय मिळाल्यानंतर महाराष्ट्रात महा जल्लोष का झाला नाही? लोकसभा निवडणुकीत जो निर्णय महाराष्ट्रातील मतदारांनी घेतला होता त्यामध्ये अवघ्या चार महिन्यात कसा काय बदल होतो?

मतदारांची मानसिकता कशी काय बदलू शकते? लोकसभा निवडणुकीत अजितदादा गटाचा फक्त एक उमेदवार निवडून आला आणि त्यांना विधानसभा निवडणुकीत 43 जागा कशा काय मिळाल्या? असे काही प्रश्न उपस्थित करून निकालाबद्दल संशय व्यक्त केला गेला आहे. राज ठाकरे सुद्धा संशय घेणाऱ्यांच्या रांगेतच आले आहेत. निवडणूक निकालाबद्दल संशय घेताना आपण महाराष्ट्रातील सर्वसामान्य मतदारांच्या वरच अविश्वास दाखवत आहोत याचे भान या मंडळींना राहिलेले नाही असे म्हणावे लागते.

महायुतीला विधानसभा निवडणुकीत जे भरघोस यश मिळाले त्याची काही कारणे राजकीय विश्लेषकांनी पुढे आणली आहेत. हिंदू मतांचे ध्रुवीकरण आणि लाडकी बहीण योजना या दोन गोष्टी महायुतीचे पारडे जड करण्यासाठी उपयोगी ठरल्या. असे मत राजकीय विश्लेषकांनी यापूर्वीच व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे हे विश्लेषण अचूक असल्याचे हीच मंडळी अप्रत्यक्षपणे मान्य करतात. तर मग ईव्हीएम मशीन बद्दल संशय घेण्याचे कारण काय? याचे समाधानकारक उत्तर मिळू शकत नाही.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांचे 13 उमेदवार विजयी झाले. त्यावेळी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातूनच मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली तेव्हा त्यांचा फक्त एक उमेदवार निवडून आला. वास्तविक राज ठाकरे यांनी तेव्हा ईव्हीएम मशीन बद्दल संशय का व्यक्त केला नाही? आता ते महाविकास आघाडीच्या आवाजात आपला आवाज का मिसळतात? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात.

हेही वाचा :

कोल्हापूर : छत्रपती राजाराम महाराज सारथी योजनेतून तब्बल 70 कोटी 8 लाख रुपये शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना वितरण

विधानभवन प्रशासनाचा ४०० कर्मचाऱ्यांना दणका, केली मोठी कारवाई

मोठी बातमी! ‘या’ राज्यातही आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण