गौप्य स्फोटाचं गांभीर्य आता राहिलंच नाही!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या पाच वर्षात फोडाफोडीच राजकारण(politics) जोरकस झालं. त्याला केंद्रस्थानी ठेवत काही राजकीय नेत्यांनी भाकीतं केली, राजकीय भूकंप होणार असे इशारे दिले, आणि गौप्य स्फोट तर इतके केले गेले की, त्याचे गांभीर्य आणि कौतुक आता राहिलं नाही. गौप्य स्फोट ऐकायचे, वाचायचे आणि सोडून द्यायचे. अशी मानसिकता सर्वसामान्य जनतेची झाली आहे.

आता तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पोलीस प्रशासनालाच राजकीय (politics)मंचावर आणले जात आहे. मुंबईचे वादग्रस्त निवृत्त पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी काही गौप्य स्फोट केले आहेत. आणि त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात थेट “सिल्वर ओक”ला म्हणजे शरद पवार यांना उभे केले आहे. डॉक्टर श्याम मानव यांनी काही दिवसापूर्वी केलेल्या आरोपावर हा उतारा आहे काय याची आता चर्चा सुरू झाली आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तुमची ईडीच्या कारवाईतून मुक्तता करू असे आमिष तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना देवेंद्र फडणवीस यांनी दाखवले होते. अनिल देशमुख यांच्याकडून त्यांना चार प्रकारची प्रतिज्ञापत्रे हवी होती. असा गौप्यस्फोट अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर श्याम मानव यांनी काही दिवसापूर्वी केला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला होता. आणि श्याम मानव यांनी जे काही सांगितले आहे ते सत्य आहे असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी माझ्या नादाला लागू नका अशी तंबी अनिल देशमुख यांना दिली होती. त्यानंतर या विषयावर राजकीय वर्तुळात काही दिवस चर्चाही सुरू होती. ही चर्चा मागे पडत असतानाच आता निवृत्त वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे.

भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर वगैरे काही नेत्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असा दबाव माझ्यावर अनिल देशमुख यांनी आणला होता. पण अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता येत नाहीत हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतरही मातोश्री वरून, सिल्वर ओक या निवासस्थानावरून, तसेच जयंत पाटील यांच्याकडून अशाच प्रकारचे दबाव माझ्यावर टाकण्यात आले होते. तुम्ही सांगताय म्हणून मी कोणावरही, पुरावा नसताना गुन्हा दाखल करू शकत नाही असे वारंवार सांगितले होते. असे परमवीर सिंग यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना स्पष्ट केले आहे. परमवीर सिंग यांनी वेगवेगळे असे चार गौप्यस्फोट केले आहेत.

विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे त्याला राजकी(politics) वास येतो आहे पण मी कायमच राजकारणापासून खूप दूर राहतो असा खुलासाही त्यांनी केलेला आहे. गंभीर गुन्हे केल्याच्या आरोपावरून सध्या तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यानेही काही पत्र प्रपंच करून अनिल देशमुख यांना टार्गेट केले आहे. सचिन वाझे याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून काही माहिती उघड केली आहे. त्याच्यानंतर आता निवृत्त ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमवीर सिंग यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

परमवीर सिंग यांच्यासारखे काही प्रामाणिक अधिकारी पोलीस प्रशासनात होते म्हणून माझ्यावर किंवा इतर नेत्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत. परमवीर सिंग हे अनिल देशमुख तसेच शरद पवार यांच्या दबावाखाली आले असते तर मला व इतर माझ्या सहकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले गेले असते असे देवेंद्र फडणवीस म्हणतात. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नेत्यांमध्ये वाद होते, मतभेद होते, पण एकमेकांचा काटा काढण्यासाठी या नेत्यांनी पोलीस प्रशासनाला कधी प्यादे म्हणून वापरले नाही. आता मात्र पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांचा शह आणि काटशहाच्या राजकारणात हत्यार म्हणून वापर केला जाऊ लागला आहे. ही बाब चिंतनीय आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी : शिंदे सरकारला सुप्रीम झटका…

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

सिनेविश्वात शोककळा! प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप